स्वतःच्याच लोकांची हत्या करतात पाकिस्तानी जनरल, पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 11:13 AM2018-04-29T11:13:43+5:302018-04-29T11:13:43+5:30
निर्वासित पाकव्याप्त काश्मीरमधील एका कार्यकर्त्यानं पाकिस्तानी जनरलवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान जनरल स्वतःच्या लोकांना मारत आहेत.
इस्लामाबाद- निर्वासित पाकव्याप्त काश्मीरमधील एका कार्यकर्त्यानं पाकिस्तानी जनरलवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान जनरल स्वतःच्या लोकांना मारत आहेत. युद्धासाठी त्यांच्याकडे स्वतःचं सैन्य आहे, असं पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते शौकत अली काश्मिरी म्हणाले आहेत. लष्कर-ए-तय्यबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनाही पाकिस्तानी जनरलच्या प्रतिनिधी आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये पश्तून समाजाच्या लोकांनी व्यापक स्वरूपात आंदोलन छेडलं आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार होत असल्याचा आरोपही केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान लष्कराच्या कारवाईत अनेक पश्तून समाजाची लोक गायब झाली आहेत. तर काहींची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तान आम्हाला गुलाम असल्यासारखी वागणूक देतोय, असा आरोप पश्तून समाजाच्या लोकांनी केला आहे. दक्षिणी वझिरिस्तानमध्येही एका 27 वर्षीय नकीबुल्लाह मेहसूदची कराची येथे गोळी घालून हत्या करण्यात आली होती.
The generals in Pakistan target their own people. For wars, they have their private militia. Organisations like Lashkar-e-Taiba, Hizbul are proxies of Pakistani military generals: Shaukat Ali Kashmiri, Exiled PoK activist pic.twitter.com/XaaA9D6q2E
— ANI (@ANI) April 29, 2018