जर्मन विंग्स विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

By Admin | Published: March 26, 2015 01:13 AM2015-03-26T01:13:22+5:302015-03-26T01:13:22+5:30

मंगळवारी आल्प्स पर्वतराजीत कोसळलेल्या जर्मन विंग्स विमानाचा ब्लॅक बॉक्स असला तरी त्याची प्रचंड तोडफोड झालेली आहे.

German wings aircraft black box found | जर्मन विंग्स विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

जर्मन विंग्स विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

googlenewsNext

पॅरिस : मंगळवारी आल्प्स पर्वतराजीत कोसळलेल्या जर्मन विंग्स विमानाचा ब्लॅक बॉक्स असला तरी त्याची प्रचंड तोडफोड झालेली आहे. या अपघातात चालक पथकासह १५० जण ठार झाले होते. बुधवारी मदत आणि बचाव पथकाने मृतदेहांचा शोध घेण्यास सुरू केले आहे. तथापि, दुर्घटनास्थळ अत्यंत दुर्गम असल्याने शोधकार्य अनेक दिवस चालेल. ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर सापडला असला तरी त्याची जुळवाजुळव करून अपघातामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फ्रेंचचे गृहमंत्री बर्नार्ड कॅझेनयूव्हे यांनी सांगितले.
कॉकपीटमध्ये चार मायक्रोफोन्स असतात. पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रक कक्षादरम्यान झालेल्या संभाषणाची व्हाईस रेकॉर्डरमध्ये नोंद होते. एवढेच नाही तर कॉकपीटमधील अनपेक्षित आवाजही यात रेकॉर्ड होतो. फ्लाईट डाटा रेकॉर्डर मात्र अजून सापडलेला नाही, असे बर्नार्ड कॅझेनयूव्हे यांनी सांगितले.
३२ हजार फूट खाली आले
एअरबस ए-३२० हे विमान जर्मन विंग्जचे होते. जर्मन विंग्ज ही लुफ्थान्साची उपकंपनी आहे. हे विमान कोसळण्याआधी अवघ्या ८ मिनिटांत ३२ हजार फूट खाली आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: German wings aircraft black box found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.