कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशातील बहूसंख्य लोक 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. जर येत्या काळात या लोकांनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम मोडमध्ये काम करण्याचा पर्याय निवडला तर, त्यांच्या पगारात कापला केली जाऊ शकते. जगातील दिग्गज कंपनी गुगलनुसार, जे कर्मचारी भविष्यात घरून काम करण्याचा पर्याय निवडतील, अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
Google ने आपल्या कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्के कपात करण्याची योजना बनवली आहे. अमेरिकेतील Silicon Valley मध्ये 'वर्क फ्रॉम होम'च्या पद्धती आणि याअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. Silicon Valley जगभरातील मोठ्या कंपन्यांसाठी ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखली जाते.
Google LaMDA : टेबल, खुर्ची आणि दरवाज्यासोबत बोलू शकणार, कसे? जाणून घ्या...
गुगलच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे, की "आमची कंपनी लोकेशननुसार आपल्या कर्मचाऱ्यांचे पॅकेज ठरवते. आमचे कर्मचारी कोणत्या शहरातून काम करतात, त्यांचे राहणे, खाणे -पिणे किती स्वस्त अथवा महाग आहे, या आधारावर आम्ही त्यांना पगार देतो."
या कंपन्यांनीही केलीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात -यापूर्वी, फेसबुक आणि ट्विटरसह Reddit आणि Zillow सारख्या कंपन्यांनीही अशा प्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. या संर्व कंपन्या लोकेशननुसार वेतन निश्चित करणाऱ्या मॉडलचाच वापर करतात. गूगलने जून महिन्यात 'वर्क लोकेशन टूल' लॉन्च केले होते.