हाफीज सईदचे हात रक्ताने माखलेले, सीआयएचे प्रतिपादन; पाकच्या राजकारणात दहशतवाद घुसविण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:05 AM2017-11-26T00:05:57+5:302017-11-26T00:06:08+5:30

मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याचे हात रक्ताने माखलेले आहेत. त्याला पाकिस्तानच्या मुख्य राजकीय प्रवाहात दहशतवादाला स्थान द्यायचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे माजी उपप्रमुख मायकेल मोरेल यांनी केले आहे.

Hafeez Saeed's hand is blood-drawn, CIA's rendering; Terrorism in Pakistan's politics | हाफीज सईदचे हात रक्ताने माखलेले, सीआयएचे प्रतिपादन; पाकच्या राजकारणात दहशतवाद घुसविण्याचा कट

हाफीज सईदचे हात रक्ताने माखलेले, सीआयएचे प्रतिपादन; पाकच्या राजकारणात दहशतवाद घुसविण्याचा कट

Next

वॉशिंग्टन : मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याचे हात रक्ताने माखलेले आहेत.
त्याला पाकिस्तानच्या मुख्य राजकीय प्रवाहात दहशतवादाला स्थान द्यायचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे माजी उपप्रमुख मायकेल मोरेल यांनी केले आहे.
जमात-उद-दावाचा प्रमुख आणि प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक असलेल्या हाफीज सईद याला संयुक्त राष्टÑे व अमेरिकेने अतिरेकी घोषित केलेले आहे. अमेरिकेने त्याच्या शिरावर १0 दशलक्ष डॉलर बक्षीस ठेवले आहे. पाकिस्तान सरकारने काल त्याची नजरकैदेतून सुटका केली. सईद जानेवारीपासून २९७ दिवस नजरकैदेत होता.
दोन वेळा सीआयएचे हंगामी प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणाºया मायकेल मोरेल यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, सईद हा दहशतवादी आहे. अनेक हल्ल्यात त्याने लष्कर-ए-तोयबा आणि अल-कायदासोबत काम केलेले आहे. त्याचे हात रक्ताने माखलेले आहेत. आता त्याला पाकिस्तानी राजकारणात दहशतवादाला स्थान मिळवून द्यायचे आहे. (वृत्तसंस्था)

लखीमपूर खेरी येथे आनंदोत्सव?
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमधील बेगम बाग कॉलनीत हाफीज सईदच्या सुटकेबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही लोकांनी आपल्या घरावर हिरवे झेंडे लावले, तसेच हाफीज सईद जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही माहिती कळताच जिल्हाधिकारी अक्षयदीप यांनी कॉलनीत पोलीस पथक तैनात केले.

पाककडून समर्थन
इस्लामाबाद : हाफीज सईदच्या सुटकेचे पाकिस्तान सरकारने जोरदार समर्थन केले आहे. त्याच्या सुटकेवर भारताने केलेल्या टीकेला उत्तर देताना पाकिस्तानी परराष्टÑ मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैसल यांनी सांगितले की, संयुक्त राष्टÑ सुरक्षा परिषदच्या निर्बंध ठरावाच्या अंमलबजावणीस पाकिस्तान बांधील आहे. पाकिस्तानच्या सर्व नागरिकांसाठी कायदा समान आहे.
येथे सर्व निर्णय कायद्यानुसार होतात, राजकीय आदेशाने नव्हे. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेधच करतो.

Web Title: Hafeez Saeed's hand is blood-drawn, CIA's rendering; Terrorism in Pakistan's politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.