Heavy Rain Saudi Arabia: वाळवंटातील सौदीमध्ये तुफान पाऊस; पुरात कार वाहून गेल्या, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 05:20 PM2022-11-25T17:20:46+5:302022-11-25T17:21:02+5:30
पाऊस एवढा जोराचा होता की रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत होते. यामुळे गाड्यादेखील वाहून गेल्या.
रियाद : सौदी अरेबियामध्ये भयानक वादळ आणि पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेक वाहने रस्त्यावरील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. या मुसळधार पावसात जेद्दाहमध्ये देखील फटका बसला आहे.
पाऊस एवढा जोराचा होता की रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत होते. यामुळे गाड्यादेखील वाहून गेल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार एकमेकांवर चढल्या होत्या. अब्जावधी रुपये खर्च करून वालवंटात नियोम शहर उभारले जात आहे, परंतू जुन्या शहरांकडे लक्ष दिले जात नाहीय, अशी टीका सौंदीच्या प्रिन्सवर होऊ लागली आहे.
मक्केच्या सरकारने सांगितले की, आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. काही महत्वाचे काम नसेल तर लोकांनी बाहोर पडू नये. मक्का आणि जेद्दाह या दोन्ही शहरांना पावसाचा फटका बसला आहे. शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसामुळे दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता. याच रस्त्यावरून मक्केला यात्रेसाठी जातात. पाऊस ओसरल्यानंतर हा रस्ता पुन्हा सुरु करण्यात आला.
Shocking footage from Jeddah, the 2nd largest city in Saudi Arabia.
— د. عبدالله العودة (@aalodah) November 24, 2022
2 people died because of the flood today.
The infrastructure in Jeddah has been an issue for more than a decade!
#جده_تغرق#جدة_الان#أمطار_جدةpic.twitter.com/QYlVrfzXlB
सौदी अरेबियाचे अधिकृत टीव्ही चॅनल अल इखबरियाने दाखवले की या पावसानंतरही मोठ्या संख्येने मुस्लिम भाविक पाण्याच्या आतून काबाला प्रदक्षिणा घालताना दिसले. जेद्दाहमधील फोटोंनुसार अनेक वाहने पाण्यात बुडाली होती.
नवे शहर...
सौदी अरेबिया हे 170 किमी लांबीचे निओम शहर बांधत आहे जे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. डोंगराळ वाळवंटात सौदी प्रिन्स हे शहर बांधत आहेत. हा जगातील सर्वात महागडा प्रकल्प असल्याचे मानले जात आहे. हे शहर तयार करण्यासाठी 500 अब्ज डॉलर्स लागणार आहेत.