अलास्कामध्ये हेलिकॉप्टर अपघात; झेक प्रजासत्ताकच्या अब्जाधीशासह ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 05:33 PM2021-03-29T17:33:42+5:302021-03-29T17:34:04+5:30
Petr Kellner Died: अलास्काच्या स्टेट ट्रूपरनी सांगितले की शनिवारी ज्या लोकांचा अपघात झाला त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या लोकांमध्ये झेक प्रजासत्ताकचे अब्जाधीश पीटर केलनर (Petr Kellner) यांचादेखील समावेश आहे.
अलास्का : अमेरिकेच्या अलास्कातील कमी लोकसंख्येचा ग्रामीण भागात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये पायलटसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झेक प्रजासत्ताकच्या (Czech Republic's) सर्वात श्रीमंत व्यक्तीचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. (Czech Billionaire Petr Kellner Dies In Alaska Helicopter Crash.)
हे हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. ते एका लॉ़जवरून गाईड आणि काही पाहुण्यांना घेऊन जात होते. अलास्काच्या स्टेट ट्रूपरनी सांगितले की शनिवारी ज्या लोकांचा अपघात झाला त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या लोकांमध्ये झेक प्रजासत्ताकचे अब्जाधीश पीटर केलनर (Petr Kellner) यांचादेखील समावेश आहे. फोर्ब्स २०२० यादीनुसार त्यांच्याकडे १७ अब्ज डॉलरची संपत्ती होती. ते ५६ वर्षांचे होते.
कोण होते केलनर....
पीटर केलनर हे झेक प्रजासत्ताकचे सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती होते. आर्थिक, टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअरिंग आणि इंन्शुरन्स क्षेत्रामध्ये कंपन्यांच्या पीपीएफ या समुहाचे ते मालक होते. या कंपन्यांमध्ये ९४००० लोक काम करतात. झेक मीडियाने सांगितले की केल्नर हेली-स्कीइंगच्या सहलीवर गेले होते. केलनर यांनी कॉपी मशिनचा व्यवसाय सुरु केला होता. यानंतर त्यांनी १९९१ मध्ये पीपीएफ ग्रुपची स्थापना केली.