Blue Origin: इतिहास रचला! जेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:36 PM2021-07-20T19:36:35+5:302021-07-20T19:49:32+5:30

Blue Origin New Shepard rocket launch to Space: कॅप्सुलमधून धडधाकट पणे बाहेर येताच या अंतराळ प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांनी गराडा घातला. बेझोस आणि त्यांच्या या टीमने यशाचे शॅम्पेन खोलून आनंदोत्सव साजरा केला.

History made by Blue Origin! Jeff Bezos team successfully returns to Earth from space | Blue Origin: इतिहास रचला! जेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले

Blue Origin: इतिहास रचला! जेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले

googlenewsNext

अंतराळ यात्रेने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेझोस (Jeff Bezos) यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) चे रॉकेट न्यू शेफर्ड (New Shepard) ने चार प्रवाशांना सुखरूप अंतराळात पोहोचवले होते. यानंतर 4 मिनिटे ही कॅप्सूल अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप पोहोचली आहे. यामध्ये बेझोसदेखील होते. (Jeff Bezos returns to Earth after suborbital flight aboard Blue Origin's rocket)

आज सायंकाळी 6.45 मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केले. कॅप्सुलने बेझोस यांच्यासह चार जणांना अंतराळात झीरो ग्रॅव्हीटीचा आनंद चार मिनिटांसाठी दिला. यानंतर बेझोस यांची कॅप्सुल 6.52 मिनिटांनी पृथ्वीवर परतली. कॅप्सुलमधून बाहेर येताच बेझोस यांनी वॅली फंक यांना कडकडून मीठी मारली. 

कॅप्सुलमधून धडधाकट पणे बाहेर येताच या अंतराळ प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांनी गराडा घातला. बेझोस आणि त्यांच्या या टीमने यशाचे शॅम्पेन खोलून आनंदोत्सव साजरा केला. सर्वाधिक खूश वॅली फंक या होत्या. त्या जगातील सर्वात जास्त वयाची अंतराळ प्रवासी बनल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी त्यांचे बालपणीचे स्वप्न साकार केले. जेफ बेजोस यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क, 18 वर्षीय ओलिवर डेमन आणि 82 वर्षीय वेली फंक होते.

Web Title: History made by Blue Origin! Jeff Bezos team successfully returns to Earth from space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.