वॉशिंग्टन: अंतराळ प्रवासाच्या दिशेने इलॉन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' कंपनीने इतिहास रचला आहे. काही दिवसांपूर्वीच स्पेसएक्सने चार सामान्य नागरिकांना अंतराळ प्रवासावर पाठवले होते. हे चारही लोक आता पृथ्वीवर सुरक्षितरित्या परतले आहेत. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल या चौघांना घेऊन अटलांटिक महासागरात उतरले.
16 सप्टेंबर रोजी स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-9 रॉकेटद्वारे अंतराळात पाठवण्यात आले होते. हे आता सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतले आहे.
या मोहिमेवर स्पेसएक्सने आनंद व्यक्त केला आहे. अंतराळात जाऊन पृथ्वीवर यशस्विरित्या परत आलेले हे पहिलेच मानवी उड्डाण होते. ही मोहिम यशस्वी केल्याबद्दल इलॉन मस्क यांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रियी स्पेसएक्सकडून देण्यात आली. दरम्यान, स्पेसएक्सचे हे ड्रॅगन कॅप्सूल पॅराशूटद्वारे अटलांटिक महासागरात सुरक्षितपणे उतरले आहे.