प्रश्न- अमेरिकेतील विद्यापीठाच्या मास्टर्स प्रोग्रामसाठी माझी निवड झाली आहे. पण अमेरिकेत अध्यक्षांकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या परिस्थितीत मी व्हिसासाठी अर्ज करू शकतो का?
उत्तर- अध्यक्ष बायडन यांनी ३० एप्रिल २०२१ रोजी अध्यक्षीय घोषणा केली. त्यानुसार भारतात असलेल्या नॉनइमिग्रंट प्रवाशांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. पण १ ऑगस्ट २०२१ पासून किंवा त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होत असलेले F1/M1 विद्यार्थी नॅशनल इंटरेस्ट एक्सेप्शनसाठी (एनआयई) पात्र ठरतात. त्यांना कोणतीही वेगळी एनआयई कागदपत्रं लागत नाहीत. अमेरिकेत जाणाऱ्या सगळ्याच विद्यार्थी प्रवाशांना वैध व्हिसा आवश्यक असतो. शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होण्याच्या ३० दिवस आधी विद्यार्थी अमेरिकत दाखल होऊ शकतात.
फॉल (उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामधला कालावधी) सेमिस्टरसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या योग्य व्यवस्थेसाठी अमेरिका कटिबद्ध आहे. अपॉईंटमेंटची उपलब्धता पाहण्यासाठी आणि वेळ घेण्यासाठी विद्यार्थी https://ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊ शकतात. अपॉईंटमेंटसाठीचे स्लॉट्स वेगानं भरत असल्यानं विद्यार्थ्यांनी अपॉईंटमेंटची उपलब्धता पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत संकेतस्थळ तपासून पहावं. फॉल २०२१ साठी अपॉईंटमेंट घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपॉईंटमेंटवर अर्जावर तातडीनं प्रक्रिया करणं आमच्यासाठी कठीण जात आहे. तुम्हाला अपॉईंटमेंट उशिरा मिळाल्यास शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विलंब होत असल्यास कृपया तुमच्या शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधून पर्यायांचा विचार करा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळच्या अमेरिकन दूतावासाची अपॉईंटमेंट घ्यावी असं सुचवतो. अपॉईंटमेंटसाठी प्रवास करणाऱ्यांनी भारतातील राज्य सरकारांनी आंतरराज्य प्रवासासाठी असलेले निर्बंध विचारात घ्यावेत. जगभरातील व्हिसा सुविधांची आणि निर्बंधांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी travel.state.gov संकेतस्थळाला भेट द्या.
प्रश्न- माझ्याकडे स्टुडंट व्हिसा आहे. माझा शैक्षणिक अभ्यासक्रम फॉल २०२१ मध्ये सुरू होतो. कुटुंबाला तातडीची गरज असल्यानं मला भारतात परतावं लागलं. मला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. माझ्या सध्याच्या व्हिसावर अमेरिकेत प्रवास करण्यासाठी मला नॅशनल इंटरेस्ट एक्सेप्शनची गरज लागेल का?
उत्तर- विद्यार्थी असलेले एफ आणि एम व्हिसा धारक, याशिवाय सीपीटी किंवा ओपीटीवर असलेले १ ऑगस्टपासून सुरू होत असलेले त्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. त्यांचा अभ्यासक्रम सुरू होण्याच्या ३० दिवस आधी ते अमेरिकेत प्रवास करू शकतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एनआयई विनंती गरजेची नाही.