उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी आपल्या देशवासीयांना अनोख्या पद्धतीनं नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कठिण काळात दाखवलेल्या विश्वासासाठी आणि दिलेल्या समर्थनासाठी त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. तसंच त्यांनी आपल्या देशातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठीही प्रार्थना केली. दरवर्षी १ जानेवारी रोजी ते जनतेला संबंधित करतात. परंतु यावेळी त्यांनी पत्राद्वारे देशवासीयांना शुभेच्छा दिल्या."ज्यामुळे लोकांचा आदर्श आणि सर्व इच्छा पूर्ण होतील अशा युगात मी देशाला आणण्यासाठी खुप मेहनत करेन. कठिण काळातही आमच्या पक्षावर विश्वास करण्यासाठी आणि आम्हाला सर्मर्थन देण्यासाठी सर्व जनतेचे मी आभार मानतो," असं किम जोंग उन यांनी पत्रात नमूद केल्याचं कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं म्हटलं आहे. "मी प्रामाणिकपणे देशवासीयांच्या आनंदासाठी आणि उत्तम आरोग्यसाठी प्रार्थना करतो," असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, उत्तर कोरियाच्या २५ दशलक्ष जनतेला त्यांचं पत्र मिळालं का नाही या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. कथितरित्या १९९५ नंतर नागरिकांना कार्ड पाठवणारे ते उत्तर कोरियाचे पहिले नेते होते. उत्तर कोरियातील माध्यमांच्या माहितीनुसार या महिन्यातच किम जोंग उन हे आपल्या पक्षाचं संमेलन आयोजित करणार आहेत. तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक टाळली जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार किम जोग उन आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहितीवर अभ्यास केला आणि त्यावर चर्चाही केली. या बैठकीत जानेवारी महिन्याच्या सुरूवातीच्याच काही दिवसांमध्ये पक्षाचं संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हे कधीपासून सुरू होईल आणि किती दिवस चालणार आहे याबाबत मात्र माहिती देण्यात आली नाही. वर्कर्स पार्टीचं हे संमेलन पाच वर्षांनंतर होणार असून देशातील हे सर्वात मोठं राजकीय संमेलन असणार असल्याचं म्हटलं जात आहे. या बैठकीत राजकीय आणि आर्थिक बाबींमध्ये कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्यात येईल, यावर निर्णय घेतले जातात.
किम जोंग उन यांनी अनोख्या पद्धतीनं दिल्या देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, "मी..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 01, 2021 11:14 AM
Kim Jong Un : किम जोंग उन यांनी देशवासीयांना दिल्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा. या महिन्याच्या सुरूवातीलाच होणार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक.
ठळक मुद्देपत्राद्वारे किम जोंग उन यांनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छाजानेवारी महिन्याच्या सुरूवातीला होणार सत्तारुढ पक्षाची बैठक, महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता