तेरहान - इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने ड्रोण हल्ला करून हत्या केल्याने इराण आणि अमेरिकेतील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घोषणा इराणकडून करण्यात आली असून, शनिवारी रात्री इराण समर्थित मिलिशियाने इराकमधील अमेरिकन दुतावासासह अन्य काही अमेरिकन ठिकाण्यांवर रॉकेट आणि मोर्टारने हल्ले केले. तसेच शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले आहेत. दरम्यान, इराणकडून झालेल्या रॉकेट हल्लानंतर इराणमधील महत्त्वाची 52 ठिकाणे निशाण्यावर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.अमेरिकी ठिकाण्यांवरील रॉकेट हल्ल्यांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर आम्ही त्यांच्या 52 ठिकाणांवर संहारक हल्ला करून ती नष्ट करू. ही 52 ठिकाणे इराण आणि त्याच्या संस्कृतीसाठी फार महत्त्वाची आहेत,''असा सज्जड इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 8:58 AM