वॉशिंग्टनः जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरला राग आळवला आहे. मोदींची सांगितलं तर काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीच मी तयार आहे, असे ट्रम्प म्हणाले आहेत. मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली आहे. मला वाटतं दोन्ही देशांनी एकत्र यायला हवं. मोदींनी ठरवलं तरच मी मध्यस्थी करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जर खरंच मोदींना वाटतं की, काश्मीर मुद्द्यावर कोणी तरी मध्यस्थता करायला हवी, तर आता त्यांनीच ठरवावं, मी या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी चर्चा केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधली लढाई बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्यामुळे ती आता संपवण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर वाद सोडवण्यासाठी मोदींनी माझ्याकडे मदत मागितल्याचा खुलासा ट्रम्प यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्याप्रमाणेच जम्मू-काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचेही ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते.
मोदींची इच्छा असल्यास मध्यस्थी करेन, ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 8:51 AM