बंडखोरांचा बेनगाझी सैन्य तळावर ताबा
By admin | Published: August 1, 2014 12:28 AM2014-08-01T00:28:26+5:302014-08-01T00:28:26+5:30
बंडखोर इस्लामी समूहांनी अनेक दिवसांच्या संघर्षानंतर लिबियाच्या बेनगाझी येथील सैन्य दलाच्या मुख्यालयावर ताबा मिळविला आहे
त्रिपोली : बंडखोर इस्लामी समूहांनी अनेक दिवसांच्या संघर्षानंतर लिबियाच्या बेनगाझी येथील सैन्य दलाच्या मुख्यालयावर ताबा मिळविला आहे. यादरम्यान उडालेल्या चकमकीत कमीत कमी ३५ सैनिक मारले गेले. यामुळे देशात अराजक निर्माण झाले आहे.
इस्लामी आणि जिहादी आघाडीने एक निवेदन जारी करून बेनगाझीतील प्रमुख सैन्य तळ ताब्यात घेतल्याची घोषणा केली. यास एका सैन्य अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या अंसार अल शरियाने फेसबुकवर शस्त्रास्त्रे असलेली छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. (वृत्तसंस्था)