प्रश्न: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं आणि ते अपडेट करणं गरजेचं का असतं?उत्तर: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही नॉनइमिग्रंट किंवा इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करत असल्यास या प्रोफाईलमुळे व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारी अचूक माहिती मिळते. दूतावासाकडून पासपोर्ट मिळवताना, संवाद साधला जात असताना ऑनलाइन प्रोफाईलची मदत होते. (importance of creating and updating an online profile to apply for US visa)
ऑनलाइन प्रोफाईलमध्ये तुम्हाला संपर्काचा तपशील, पासपोर्टची माहिती, मुलाखतीची तारीख आणि वेळ, कागदपत्रं गोळा करण्यासंदर्भातील आणि इतर माहिती द्यावी लागते. ऑनलाइन प्रोफाईलमुळे व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर (व्हीएसी), दूतावास यांच्यात आवश्यक ताळमेळ राखला जातो. यामुळे तुमच्या अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होते.
तुम्ही पहिल्यांदा अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करत असाल, तर न्यू युजर हा पर्याय निवडा. आधी व्हिसासाठी अर्ज केलेला असल्यास आधीच तयार करण्यात आलेल्या प्रोफाईलवर लॉग इन करा. तुम्हाला प्रत्येकवेळी तुमची सर्व माहिती भरण्याची गरज नाही. मात्र तुम्ही कशासाठी अमेरिकेला जात आहात, याबद्दलची माहिती भरुन प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. याशिवाय तुमचा सध्याचा संपर्क तपशील देणंदेखील आवश्यक आहे.
ऑनलाइन प्रोफाईल अतिशय युजर फ्रेंडली टूल आहे. यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिसा प्रक्रिया पूर्ण करू शकता. बहुतांश अर्जदारांना तिसऱ्या व्यक्तीची मदत लागत नाही. तुम्ही स्वत: संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असाल, तर चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यतादेखील कमी होते. याशिवाय पैशांचीदेखील बचत होते. मात्र तरीही थर्ड पार्टी एजंटची मदत घेण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. अशा परिस्थितीत तुमची आणि तुमच्या वतीनं अर्ज करणाऱ्या व्यक्तीची योग्य माहिती अर्जात भरली गेली आहे ना, याची खात्री करा. चुकीची माहिती दिल्यानं तुम्ही व्हिसासाठी अपात्र ठरू शकता.
ऑनलाईन प्रोफाईल तयार करणं आणि ते अपडेट करणं यामुळे तुमची अमेरिका ट्रिफ अविस्मरणीय आणि तणावमुक्त होण्यास सुरुवात होते.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.