Imran Khan : जम्मू काश्मीरमधील कलम 370 वरुन मोदींवर टीका, इम्रान खान यांचं अज्ञान उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:52 PM2021-10-12T13:52:58+5:302021-10-12T13:54:07+5:30
Imran Khan : पाकिस्तानी क्रिकेटसंदर्भातही खान यांनी या मुलाखतीत आपले विचार व्यक्त केले. Middle East Eye चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याचं त्यांनी म्हटलं.
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींबद्दल केलेल्या विधानावरुन सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. आपल्या ज्ञानातून त्यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा नेटीझन्सने समाचार घेतल्याचं दिसून येते. इम्रान खान यांनी एका मुलाखतीत मोदींबद्दल बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला गेले, त्यानंतर त्यांनी देशातील कलम 370 हटवले, असे खान यांनी म्हटलं आहे. खान यांच्या या उत्तरामुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये इस्रायलचा दौरा केला होता. त्यानंतर, जवळपास 2 वर्षांनी जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दावा करताना, मोदींनी इस्रायलचा दौरा करुन येताच विशेष अधिकार असलेले कलम 370 हटविल्याचे म्हटले आहे. भारत आणि इस्रायलची खास मैत्री असल्याचंही खान यांनी म्हटलं आहे. काश्मीरच्या नावाखाली भारत आणि इस्रायल यांना टार्गेट करण्याचा खान यांचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. पण, मुलाखतीतील या उत्तरातून ते आता चांगलेच फसले आहेत.
Almost 2 yrs & one month long duration b/w PM @narendramodi ‘s July 17 visit to Israel and Aug 19 repeal of 370; but for @ImranKhanPTI - so used to writing alternate history- 25 months difference is immediately thereafter!
— Alok Bhatt (@alok_bhatt) October 11, 2021
Kya namoona chuna hai @OfficialDGISPR ne! pic.twitter.com/J3Mw8AJJjf
पाकिस्तानी क्रिकेटसंदर्भातही खान यांनी या मुलाखतीत आपले विचार व्यक्त केले. Middle East Eye चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याचं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानसोबत दौरा रद्द करुन इंग्लंडने स्वत:ची प्रतिमा कमी केली आहे. इंग्लंडला असे वाटते की, पाकिस्तानसारख्या देशांसोबत क्रिकेट खेळून ते या देशावर उपकार करत आहेत. याचं कारण म्हणजे पैसा, कारण पैसाच सध्या सर्वात मोठा खेळाडू बनलाय, अशी भावना त्यांच्यात दिसत असल्याचंही खान यांनी म्हटलं. भारताकडे पैसा आहे, त्यामुळे भारत क्रिकेट विश्वाला नियंत्रित करू शकतो, असे भाकीतच खान यांनी केलं.