इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:19 AM2018-07-27T01:19:07+5:302018-07-27T01:19:14+5:30

अतिरेकी व कट्टरवाद्यांशी संबंध; लष्कर व आयएसआयचाही वाढणार दबाव

Imran Khan's victory is a problem for India | इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच

इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच

Next

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : कट्टरवादी व अतिरेकी गटांशी संबध असल्याने पाकिस्तानात तालिबान खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान खानने भारताशी संबंध सुधारावेत अशी इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली असली तरी त्याचे विजयी होणे भारताला अडचणीचेच ठरण्याची शक्यता आहे. ते पंतप्रधान झाले तरी पाकिस्तानवर तेथील लष्कर तसेच आयएसआय ही गुप्तचर संघटना यांचा दबाव असेल, असे भारत व पाकिस्तानातील तज्ज्ञांचे मत आहे.
काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांतील महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची पाकिस्तानची भूमिका आहे, असे सांगतानाच, गेल्या ३० वर्षांत काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचा भंग केला आहे असाही आरोप त्यांनी केला. गरिबी व दारिद्र्य ही पाकिस्तानसमोरील सर्वात मोठी आव्हाने असून, ती सोडवण्यासाठी आमच्यापुढे चीन हा आदर्श आहे, असे मत त्याने व्यक्त केले. जिना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान निर्माण करण्यासाठी आपण झटणार आहोत असेही ते म्हणाले.
भारतीय प्रसार माध्यमांनी माझे वाईट पद्धतीने चित्रण केले. त्याचे मला दु:ख आहे, मला भारताशी चांगले संबंध हवेत आणि पाकिस्तान व भारत यांच्यातील व्यापार वाढावा, अशी माझी इच्छा आहे, असे ते इम्रान खान म्हणाले. मात्र नवाज शरीफ हे भारताबाबत सौम्य भूमिका घेतात, असा आरोप ते करीत. त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी निवडणुकांत गैरप्रकार झाल्यानेच हे घडल्याचा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केले. पण गैरप्रकारांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले. (वृत्तसंस्था)

नवाज शरीफ व त्यांची कन्या मरियम तुरुंगात आहेत. आपण तुरुंगात असल्याचा फायदा आपल्या पक्षाला मिळेल, हा त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला आहे. उलट इम्रान खान सत्तेत आल्यास त्यांच्या अडचणी वाढतील.

कट्टरवाद्यांना शिकवला धडा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचे पाठबळ असलेली अल्ला हो अकबर तहरीक व बंदी घातलेल्या इतर संघटना तसेच दहशतवादी, कट्टरपंथी विचारांची मंडळी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या रिंगणात उतरली होती. पण त्यांना मतदारांनी अजिबात थारा दिला नाही.
दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या एकालाही मतदारांनी विजयी केले नाही. कट्टरपंथी इस्लामी गट या निवडणुकांत उतरल्याने चिंता व्यक्त होत होती. पण आता या सर्व गटांना व व्यक्तींना पाकिस्तानातील मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली.

सईदचा मुलगा, नातूही पराभूत
हाफिज सईदने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या. पण त्याचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. सईदचा मुलगा हाफिज तल्हा सईद व नातू खालिद वालिग्द पराभूत झाले. तहरीक-ए-लाबैक पाकिस्तान या सुन्नी संघटनेनेही उभे केलेले १०० उमेदवार विजयाच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. मुत्तहिदा मजलिस-ए-अम्ल या काही पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांपैकी बहुतेक जणांना पराभव पाहावा लागला.

Web Title: Imran Khan's victory is a problem for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.