जर्मनीत भारतीय दाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:09 PM2019-03-31T12:09:10+5:302019-03-31T12:09:17+5:30
जर्मनीमध्ये भारतीय दाम्पत्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
नवी दिल्ली - जर्मनीमध्येभारतीय दाम्पत्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जर्मनीतील म्युनिक येथे एका प्रवाशाने भारतीय दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी जखमी झाली आहे. या हल्ल्यात प्रशांत बसरूर (49) यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी स्मिता (43) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय दाम्पत्या प्रशांत आणि स्मिता बसरूर यांच्यावर म्युनिक येथे एका प्रवाशाने चाकू हल्ला केला. दुर्दैवाने या हल्ल्यात प्रशांत यांचा मृत्यू झाला. तर स्मिता या गंभीर जखमी झाल्या. स्मिता यांची प्रकृती आता स्थिर आहे. आम्ही प्रशांत यांच्या भावाला जर्मनीत पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. अशा दुखाच्या प्रसंगी आमची संवेदना बसरूर कुटुंबीयांसोबत आहे.
Indian couple Prashant and Smita Basarur were stabbed by an immigrant near Munich. Unfortunately, Prashant has expired. Smita is stable. We are facilitating the travel of Prashant's brother to Germany. My heartfelt condolences to the bereaved family. /1
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 30, 2019
भारतीय दाम्पत्यावर हल्ला करणारा 33 वर्षीय हल्लेखोर हा न्यू गिनी येथील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली असून, त्याने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. मात्र त्याने भारतीय दाम्पत्यावर का हल्ला केला. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
I appreciate the good work by @cgmunich. I have asked our mission to take care of their two children. /2
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 30, 2019
प्रशांत बसरूर हे मुळचे भारतातील कर्नाटक राज्यातील उडुपी येथील होते. 15 वर्षांपूर्वी बसरूर दाम्पत्या जर्मनी येथे गेले होते. तसेच त्यांना गेल्यावर्षी जर्मनीचे नागरिकत्व मिळाले होते. त्याआधी त्यांनी बंगळुरू आणि हैदराबाद येथेही काही काळ वास्तव्य केले होते.