मेक्सिकोमध्ये बंदुकधाऱ्यांनी केला अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह १८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:45 AM2022-10-06T10:45:45+5:302022-10-06T10:50:53+5:30
मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करून १८ जणांची हत्या केली आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे.
मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करून १८ जणांची हत्या केली आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे. आरोपींनी दक्षिण-पश्चिम मेक्सिकोतील सॅन मिगुएल टोटोलापन येथे सिटी हॉल आणि जवळच्या घरावर गोळीबार केला, यात किमान १८ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.तसेच तीन जण जखमी झाले आहेत.
या घटनेचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये सिटी हॉलच्या भिंतींवर शेकडो गोळ्या दिसत आहेत. हॉलच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये अनेकांचे मृतदेह पडलेले दिसत आहेत. मृतांमध्ये महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील आणि माजी महापौर जुआन मेंडोझा आणि इतर शहर पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.
केरळमध्ये बसचा भीषण अपघात; 5 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू, 38 जखमी
या हल्ल्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आता शहरात नाकाबंदी करून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पण अद्याप एकही अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी हा हल्ला सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.