2050पर्यंत बुडू शकते 'या' देशाची राजधानी; काही भाग आतापासूनच पाण्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:03 PM2019-08-16T17:03:07+5:302019-08-16T17:03:23+5:30

पृथ्वीवर सर्वात जलदरीत्या बुडणाऱ्या शहरांमध्ये जकार्ताला इशारा देण्यात आला आहे.

Indonesia ponders plan to move capital from Jakarta | 2050पर्यंत बुडू शकते 'या' देशाची राजधानी; काही भाग आतापासूनच पाण्यात 

2050पर्यंत बुडू शकते 'या' देशाची राजधानी; काही भाग आतापासूनच पाण्यात 

googlenewsNext

जकार्ताः पृथ्वीवर सर्वात जलदरीत्या बुडणाऱ्या शहरांमध्ये जकार्ताला इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात पर्यावरणतज्ज्ञांनी जकार्ताला सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जकार्ताचा एक तृतीयांश भाग 2050मध्ये बुडू शकतो. जकार्तामध्ये जवळपास 10 मिलियन लोक वास्तव्याला आहेत. इथे अनेक दशकांपासून भूजल साठे अनियंत्रित होत असून, समुद्राच्या पाण्याचा स्तरही वेगानं वाढतो आहे. तसेच हवामान बदलही याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

जकार्तातील काही भाग आतापासूनच पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली असून, सरकारचे उपाय तोकडे पडत आहेत. त्यामुळेच सरकारनं आता कठोर पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. इंडोनेशियाची राजधानीच बदलण्याचा घाट सरकारनं घातला आहे. त्यामुळे लवकरच इंडोनेशियाच्या नव्या राजधानीची घोषणा झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

इंडोनेशियाचे राष्ट्रपती डोको विदोदो यांनी ट्विटवर सांगितलं की, आमच्या देशाची राजधानी लवकरच बोर्निया द्विपावर स्थलांतरित करण्यात येईल. देशाच्या प्रशासनिक आणि राजनैतिक केंद्रांना स्थलांतरित करणं हे राष्ट्रीय संरक्षणाचंच एक कार्य आहे. परंतु जकार्तासाठी सध्या धोक्याची घंटाच आहे. 

Web Title: Indonesia ponders plan to move capital from Jakarta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.