लक्षणे न आढळणाऱ्या रुग्णांच्या वस्तू वापरल्याने संसर्ग होत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:23 AM2020-06-10T03:23:42+5:302020-06-10T03:23:52+5:30
जागतिक आरोग्य संघटना : विविध देशांतील रुग्णांचा अभ्यास
जिनेव्हा : लक्षणे न आढळणाऱ्या ‘कोविड-१९’च्या रुग्णांच्या दैनंदिन वापरातील वस्तू वापरल्याने संसर्ग होत नाही, असा निष्कर्ष वूहानमध्ये करण्यात आलेल्या बाधितांच्या अभ्यासानंतर काढण्यात आला आहे. चीनमध्येही नुकतेच या अभ्यासाचे निष्कर्ष सार्वजनिक करण्यात आले. यानुसार, ‘कोविड-१९’चे माहेरघर असलेल्या वूहानमध्ये सुमारे १ कोटी नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे नसलेले ३०० रुग्ण आढळले आहेत. चीनमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, लक्षणे नसलेल्या वूहानमधील ३०० रुग्णांचा टूथब्रश, मग, टॉवेल, मास्क अशा वस्तू वापरणाºया १ हजार १७४ नागरिकांचाही अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
लक्षणे नसलेल्या बाधिताकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाही, असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. यासोबतच लक्षणे नसलेल्या बाधितांच्या वस्तू वापरणाऱ्यांना संसर्ग झाला नसल्याच्या निष्कर्षामुळे तज्ज्ञांना सुखद धक्का बसला आहे.
साथरोग विशेषज्ज्ञ मारिया वॅन केरकोव या जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन आजार तसेच पशूंपासून मानवाला होणाºया आजार या विभागाच्या प्रमुख आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक देशांतील उपचार घेणाºया रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांपैकी आजाराची कोणतीही लक्षणे नसलेल्या बाधितांचा आम्ही अभ्यास केला. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ‘कोविड-१९’ संदर्भातील कोणताही त्रास जाणवला नाही.’’ (वृत्तसंस्था)
येथेही डब्ल्यूएचओचे घूमजाव
च्मार्च तसेच एप्रिल महिन्यात ही साथ जगभर वेगात पसरत होती. या काळात कोणतीही लक्षणे नसलेली अनेक प्रकरणे समोर येत होती. परंतु तेव्हा डब्ल्यूएचओने अशा रुग्णांकडूनदेखील संसर्ग पसरत असल्याचे म्हटले होते. संसगार्बाबत डब्ल्यूएचओसारख्या जबाबदार संस्थेने अनेकदा अशी विसंगत भूमिका घेतल्याने अनेक देशांकडून प्रश्न उपस्थित केले होते.