लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि ‘एच ९ एन २’ संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
चीनमध्ये आढळलेल्या एव्हीयन इन्फ्लूएंझा (एच ९ एन २) आणि श्वसन रोगांचा धोका भारताला कमी आहे. चीनमधील इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत तयार आहे. उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
n‘डब्ल्यूएचओने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात या संसर्गाचा मानव ते मानव प्रसार होण्याची शक्यता कमी आहे आणि आतापर्यंत आढळलेल्या ‘एच ९ एन २’ प्रकरणांमध्ये मृत्यूदर कमी आहे,’ असेही मंत्रालयाने म्हटले आहे.