लेह/बीजिंग : डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील तणाव सुरू असतानाच चिनी सैनिकांनी मंगळवारी सकाळी दोनदा लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. मात्र, असे काही घडल्याची आपणास माहिती नाही, अशी साळसूद भूमिका चीन सरकारने घेतली आहे. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यानेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.पँगाँग भागात घुसखोरी करणाºया भारतीय जवानांनी अटकाव केल्यानंतर चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर दगडफेकही केली. शिवाय दोन्हीकडील सैनिकांमध्ये सुमारे अर्धा तास धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे. त्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत काही जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येते. घुसखोरीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.मंगळवारी, भारताच्या स्वातंत्र्य दिनीच चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी सकाळी ६ आणि त्यानंतर पुन्हा ९ वाजता भारतीय सीमा भागातील फिंगर फोर आणि फिंगर फाइव्ह भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यापैकी फिंगर फोर भागात प्रवेश करण्यात चीनच्या सैनिकांना यश आले.मात्र भारतीय जवानांनी त्यांनालगेच अडवून माघारी तेथून हाकलूनदिले. भारतीय जवानांच्या अटकावापुढे घुसखोरी करणे शक्य होत नसल्याचेलक्षात आल्यानंतर चिनी सैनिकांनीभारतीय जवानांवर दगडफेक केली.मात्र त्यालाही भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.>पंतप्रधान मोदींनी घेतली अधिकाºयांची बैठकचीनला लागून असलेल्या तिन्ही सीमांवरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर विभागाचे संचालक, रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंगचे सचिव व महत्त्वाचे संरक्षण अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे भाषण संपताच त्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. मात्र, संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी तेथील परिस्थितीबद्दल काहीहीभाष्य केले नाही.>भारताचा पहारालडाखचा फिंगर फोर भाग आपला असल्याचे दावा चीनने सुरू केला भारताने १९९0 झालेल्या चर्चेच्या वेळी त्या भागावर आपला दावा केला होता. मात्र, त्यानंतर फिंगर फोरपर्यंत रस्ता बनवून हा अक्साई चीनचा भाग असल्याचे सांगण्यास सुरुवात केली.सुरुवातीला चिनी सैनिक तलावाच्या उत्तर आणि दक्षिण काठाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, आता या भागात भारताचा सशस्त्र पहारा आहे.
चीनच्या सैनिकांची लडाखमध्ये घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:12 AM