तेहरान - इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने शुक्रवारी हत्या केली. सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली असून, सुलेमानींच्या हत्येस जबाबदार असलेल्या अमेरिकेच्या सैन्यदलालाच इराणने दहशतवादी घोषित केले आहे.
ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी इराणचे इनाम, ८ कोटी डॉलरचे बक्षीस
इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकी दूतावासावर रॉकेट हल्ला, मशिदीवर लाल झेंडा फडकावून इराणकडून युद्धाची घोषणा सुलेमानींच्या हत्येनंतर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शुक्रवारी सुलेमानींची हत्या झाल्यानंतर शनिवारी रात्री इराण समर्थित मिलिशियाने इराकमधील अमेरिकन दुतावासासह अन्य काही अमेरिकन ठिकाण्यांवर रॉकेट आणि मोर्टारने हल्ले केले होते. तसेच शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले होते. तर इराणकडून झालेल्या रॉकेट हल्लानंतर इराणमधील महत्त्वाची 52 ठिकाणे निशाण्यावर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. तर इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यासाठी 80 मिलियन डॉलर बक्षीस देण्याचे घोषित केले आहे.