Iran Plane: अखेर इराणचे 'ते' विमान ग्वांगझूत उतरले, बॉम्बच्या सूचनेमुळे दिल्लीत लँडिंगची नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:21 PM2022-10-03T17:21:56+5:302022-10-03T17:58:32+5:30

या विमानाने ठरलेल्या ठिकाणावर लँडिंग केल्यामुळे इराण, पाकिस्तान, भारत आणि चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Iran Plane: Iran's Bomb plane finally landed in Guangzhou, denied landing in Delhi due to bomb threat | Iran Plane: अखेर इराणचे 'ते' विमान ग्वांगझूत उतरले, बॉम्बच्या सूचनेमुळे दिल्लीत लँडिंगची नाकारली

Iran Plane: अखेर इराणचे 'ते' विमान ग्वांगझूत उतरले, बॉम्बच्या सूचनेमुळे दिल्लीत लँडिंगची नाकारली

Next

Iran Plane:इराणपासून भारत आणि चीनमध्येही दहशत निर्माण करणाऱ्या इराणच्या W581 विमानाने अखेर आपल्या ठरलेल्या ग्वांगझूमध्ये सुरक्षित लँडिंग केली आहे. या लँडिंगमुळे इराण, पाकिस्तान, भारत आणि चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इराणच्या 'महान एअर'ने एक निवेदन जारी करुन विमान लँड झाल्याची माहिती दिली.

इराणची एअरलाइन्स 'महान एअर'ने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक W581 ने तेहरानहून उड्डाण केले. सकाळी 9.20 च्या सुमारास विमान भारताच्या हवाई हद्दीत पोहोचले. यावेळी विमानाच्या पायलटने दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली. तसेच, विमानाला दिल्लीत उतरण्याची परवानगीही मागितली. ही मागणी ऐकून दिल्ली हवाई वाहतूक नियंत्रण तात्काळ सतर्क झाले.

दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलने तात्काळ सुरक्षा यंत्रणा आणि भारतीय हवाई दलाला माहिती दिली. सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन हवाई दलाने या विमानाला दिल्लीत उतरू दिले नाही. तसेच, हवाई दलाने जोधपूर एअरबेसवरून तात्काळ सुखोई विमाला एकत्र करण्याचे निर्देश दिले. फ्लाइटरडार 24 च्या माहितीनुसार, विमान दिल्लीत उतरण्याचा प्रयत्न करत होते. पण, हवाई दलाने 2 सुखोई विमानांद्वारे या विमानाला आकाशातच घेरले.

दरम्यान, प्रसंगावधान समजून या विमानाला जयपूर किंवा चंदीगडला उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र पायलटने या शहरांमध्ये उतरण्यास नकार दिला. पायलट दिल्लीतच लँड करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान 45 मिनिटे, म्हणजेच सकाळी 9.20 ते 10.5 पर्यंत हे विमान दिल्लीच्या आकाशात घिरट्या घालत राहिले. भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, भारताच्या सुरक्षा यंत्रणांना या विमानाबाबत कोणताही धोका पत्करायचा नव्हता. अखेर काही वेळाने हे विमान ग्वांगझूला रवाना झाले.
 

Web Title: Iran Plane: Iran's Bomb plane finally landed in Guangzhou, denied landing in Delhi due to bomb threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.