हमासचा नायनाट होणार? ३ लाख सैनिक आणि रणगाडे सीमेवर दाखल, फक्त एका आदेशाची वाट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:13 PM2023-10-19T22:13:29+5:302023-10-19T22:14:33+5:30

सीमेवरील फौजफाटा पाहता, इस्रायली सैनिक फक्त एकाच आदेशाची वाट पाहत आहेत, त्यानंतर गाझामध्ये जमिनीवर हल्ला सुरू होईल.

israel gaza war 3 lakh soldiers hundreds of tanks waiting for us president jo biden permission here is gaza devastation plan | हमासचा नायनाट होणार? ३ लाख सैनिक आणि रणगाडे सीमेवर दाखल, फक्त एका आदेशाची वाट 

हमासचा नायनाट होणार? ३ लाख सैनिक आणि रणगाडे सीमेवर दाखल, फक्त एका आदेशाची वाट 

इस्रायल-हमास युद्धाचा आजचा १३ वा दिवस निर्णायक ठरू शकतो. हमास आणि गाझाबाबत इस्रायल अतिशय आक्रमक झाले असून रात्रीपासून येथे वेगाने हल्ले केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझावर कधीही जमिनीवर हल्ला सुरू होऊ शकतो आणि जवळपास तीन लाख इस्रायली सैनिक आणि शेकडो रणगाडे गाझा सीमेवर दाखल झाले आहेत. सीमेवरील फौजफाटा पाहता, इस्रायली सैनिक फक्त एकाच आदेशाची वाट पाहत आहेत, त्यानंतर गाझामध्ये जमिनीवर हल्ला सुरू होईल आणि मग हमासची उलटी गिनतीही सुरू होईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि नेतान्याहू यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर जमिनीवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी हमासला पूर्णपणे नष्ट करण्याची योजनाही शेअर केली. मात्र, समोर येत असलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या हल्ल्यादरम्यान ओलिसांना वाचवण्याला प्राधान्य दिले जाणार असून ओलिसांना अजिबात इजा होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीनंतर हमासलाही वाटते की, इस्रायल आता थांबणार नाही आणि त्यासाठी त्यांच्या बाजूने करार झाल्याचे सांगण्यात आले. जर इस्रायलने २४ तासांच्या युद्धविरामास सहमती दिली असती तर दहशतवादी गट गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या महिला, मुले आणि परदेशी लोकांना सोडण्यास तयार झाला असता, असे म्हटले जात आहे. वेस्ट बँकमधील हमासचे राजकीय नेते शेख हसन युसूफ यांनी द ग्लोब आणि मेलला एका खास मुलाखतीत सांगितले.

हमासला महिला आणि मुलांना ओलिस ठेवण्यात काही स्वारस्य नाही. जर इस्रायलने मानवतावादी मदत गाझापर्यंत पोहोचण्यासाठी शत्रुत्वात २४ तासांच्या विराम देण्यास सहमती दर्शवल्यास हमास त्यांना सोडण्यास तयार होईल. आमच्याकडे ओलिस आहेत, ते आमचे पाहुणे आहेत आणि आम्हाला या ओलिसांद्वारे कोणतीही अडचण नाही, असे शेख हसन यूसुफ म्हणाले. तसेच, हमास ७४ वर्षीय शांतता कार्यकर्ते व्हिव्हियन सिल्व्हर यांसारख्या ओलिसांना ठेवण्याला कसे योग्य ठरू शकते?  या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, "जेव्हा परिस्थिती परवानगी देईल तेव्हा आम्ही त्यांची सुटका करू."

दरम्यान,  इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत ३०६ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने गाझामध्ये किमान २०३ लोकांना ओलीस ठेवले असून ओलिसांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे (आयडीएफ) प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, ७ ऑक्टोबरपासून हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून ३०६ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे आयडीएफने असेही जाहीर केले.

Web Title: israel gaza war 3 lakh soldiers hundreds of tanks waiting for us president jo biden permission here is gaza devastation plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.