Israel-Palestine Clash: इस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 04:08 PM2021-05-16T16:08:19+5:302021-05-16T16:10:56+5:30

Israel-Palestine Clash: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील भीषण संघर्ष सातव्या दिवशीही सुरू आहे.

israel palestine clash israeli army targets home of top hamas leader in gaza | Israel-Palestine Clash: इस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त  

Israel-Palestine Clash: इस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त  

googlenewsNext
ठळक मुद्देइस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्लाहमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त

जेरुसलेम:इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. इस्रायलचे सैन्य आणि गाझा पट्टीवर नियंत्रण असलेला पॅलेस्टिनी कट्टरपंथीय गट हमास पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील भीषण संघर्ष सातव्या दिवशीही सुरू आहे. अशातच आता इस्रायली सैन्याने गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला असून, यामध्ये हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. (israel palestine clash israeli army targets home of top hamas leader in gaza)

इस्रायलच्या लढाऊ विमानांद्वारे हवाई हल्ले सुरूच आहे. तर, हमासदेखील सातत्याने रॉकेट हल्ला करत आहे. हमासने सुमारे २ हजार रॉकेट डागले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने हमासविरोधातील कारवाई तीव्र केली असून आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली आहे. सेना प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल हिदाई जिल्बरमॅन यांनी यासंदर्भातील माहिती इस्रायली रेडिओला दिली. हमासमधील सर्वांत ज्येष्ठ नेते येहियेह सिनवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचे समजते. 

कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

मीडिया ऑफिसेसचे मोठे नुकसान

इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील असोसिएट प्रेस, अल जजीरासह अन्य मीडिया ऑफिसेसचे मोठे नुकसान झाले आहे. मीडिया ऑफिसेसची बिल्डिंग इस्त्रायलच्या हल्ल्यात अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहे. इस्रायलच्या सैन्याने गाझा शहरातील काही बिल्डिंग रिकाम्या करण्याबाबत इशारा दिला होता. याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात १२ मोठ्या बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या. मात्र या ठिकाणच्या हल्ल्यामागचे  अधिकृत स्पष्टीकरण इस्रायलने दिले नाही.

“जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

इस्रायल-पॅलेस्टाइनचा संघर्ष तीव्र

इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संघर्षात आतापर्यंत ४१ मुलांसह १४९ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. तर, जवळपास एक हजार नागरिक जखमी झाले आहेत. हमासच्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलचे किमान १० जण ठार झाले आहेत. निवासी इमारतींमध्ये लपून हमासकडून रॉकेट हल्ले सुरू असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यापूर्वी शनिवारी गाझा शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलने हवाई हल्ला केला होता.
 

Web Title: israel palestine clash israeli army targets home of top hamas leader in gaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.