इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 11:17 AM2023-10-21T11:17:36+5:302023-10-21T11:18:54+5:30
"गाझाच्या 90 टक्के समुद्र सीमेवर आणि भू सीमेवर इस्रायलचे नियंत्रित आहे. इजिप्तला लागून असलेली एक छोटी सीमा सोडल्यास, गाझाचा इतर जगाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही."
इजरायल आणि हमास यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. यातच, इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी शुक्रवारी म्हटले आहे की, या लष्करी कारवाईचा एक हेतू गाझासाठी असलेली इस्रायलची जबाबदारी संपवणे आहे. गाझाच्या 90 टक्के समुद्र सीमेवर आणि भू सीमेवर इस्रायलचे नियंत्रित आहे. इजिप्तला लागून असलेली एक छोटी सीमा सोडल्यास, गाझाचा इतर जगाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही. गेल्या 2007 मध्ये हमासने गाझावर कब्जा केल्यानंतर, इस्रायलने या भागात कडक नाकाबंदी लागू केली. एवढेच नाही, तर आयात-निर्यातीवरही कडक निर्बंध आहेत.
इस्रायलने म्हटले आहे की, आपल्या लष्करी कारवाईचा दीर्घकालीन उद्देश गाझासोचे सर्व संबंध तोडणे आहे. यासंदर्भात बोलताना इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले, हमासचा पराभव झाल्यानंतर, इजरायल गाझा पट्टीतील आपली जबाबदारी संपवेल. या युद्धापूर्वी, गाझाला वेजेसह इतर सर्व महत्वाच्या गोष्टींचा पुरवठा इस्रायलकडून होत होता. मात्र, युद्धपासून इस्रायलने गाझाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यातच, हे युद्ध दीर्घकाळ चालेल, असे इस्रायली सेन्याकडून सांगण्यात आले आहे.
तीन टप्प्यांत हल्ला चढवणार -
गाझामध्ये घुसून कारवाई करण्याची इस्रायलच्या लष्कराची तयारी आहे. गाझा मोहिमेची माहिती देताना गॅलेंट म्हणाले, या हल्ल्याचे तीन टप्पे असतील. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात हमासच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात कमी तीव्रतेच्या कारवाईचा समावेश असेल. यात सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल. तर, तिसऱ्या टप्प्यात गाझा पट्टीतील जीवनासाठी असलेली इस्रायलची जबाबदारी संपूष्टात आणली जाईल आणि इस्रायली नागरिकांसाठी एक नवी सुरक्षा व्यवस्था तयार केली जाईल.