संयुक्त राष्ट्रात (यूएन) इस्रायलचे राजदूत गिलाद एर्दन यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा (यूएनएचआरसी) वार्षिक रिपोर्ट (अहवाल) फाडल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही, तर या रिपोर्टची खरी जागा कचराकुंडीत असून, याचा काहीही उपयोग नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी हा रिपोर्ट इस्रायल विरोधी आणि पक्षपाती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
खरे तर, इस्रारायल-पॅलेस्टाईन संघर्षावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने महासभेत एक विशेष बैठक बोलावली होती. याथे याचे अध्यक्ष मिशेल बाचेलेट यांनी सर्व सदस्य देशांसमोर वार्षिक रिपोर्ट सादर केला.
या रिपोर्टमध्ये गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या तपास समितीचा निष्कर्ष सादर करण्यात आला होता. यात 67 मुले, 40 महिला आणि 16 वृद्धांसह 260 पॅलिस्टिनींचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अकेन कुटुंब उद्धवस्त झाले होते. यूएनएचआरसीच्या या रिपोर्टमध्ये गाझावरील हल्ल्यांसाठी इस्रायलची निंदा करण्यात आली होती.
महासभेत शुक्रवारी झालेल्या विशेष सुनावणीदरम्यान मानवाधिकार परिषदेच्या अध्यक्षांनी चौकशी समितीचा वार्षिक रिपोर्ट सर्व सदस्य देशांसमोर मांडला. या रिपोर्टमध्ये मे महिन्यात हमाससोबत झालेल्या संघर्षानंतर, स्थापन करण्यात आलेल्या तपास समितीचा निकाल आहे. रिपोर्टच्या मोठा भागात इस्रायलचा निषेध करण्यात आला आहे, तर इस्रायली नागरिकांवर हमासच्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करण्यात आहे.
यावेळी महासभेला संबोधित करताना एर्दन म्हणाले, 15 वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासून मानवाधिकार परिषदेने जगातील इतर सर्व देशांविरोधात 142 पैकी 95 वेळा इस्रायलचीच निंदा केली आहे. मानवाधिकार परिषद पूर्वाग्र दूषित आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमाने ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे म्हणत त्यांनी हा रिपोर्ट फाडला.