अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 08:33 AM2019-08-04T08:33:27+5:302019-08-04T08:37:50+5:30
शनिवार असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या.
टेक्सास - अमेरिकेच्या टेक्सास येथे शनिवारी अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासच्या एल पासो येथील वॉलमार्टमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबारात 20 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला करणारा 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत ट्विट करुन लिहिलं आहे की, एल पासो येथे झालेली गोळीबाराची घटना फक्त दुख:दायक नाही तर क्रुर आहे. अशी शत्रुत्वाची भावना ठेवणाऱ्या घटनांचा मी निषेध करतो. निर्दोष लोकांचे जीव घेणाऱ्यांबद्दल कोणतीही सहानभुती दाखविणं चुकीचं ठरेल.
Today’s shooting in El Paso, Texas was not only tragic, it was an act of cowardice. I know that I stand with everyone in this Country to condemn today’s hateful act. There are no reasons or excuses that will ever justify killing innocent people....
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 4, 2019
शनिवार असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या. हल्लेखोराने काळा टी शर्ट आणि कानात हेडफोन घालून असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. अंतर्गत दहशतवाद पसरविण्याच्या हेतूने गोळीबार करण्यात आली का या दिशेने पोलीस चौकशी करत आहेत.
तसेच पोलिसांनी या घटनेच्या वेळी कोणी फोटो अथवा व्हिडीओ काढले असल्यास ते आमच्याकडे जमा करावेत असं आवाहन केलं आहे.
@FBIElPaso@EPPOLICE@TxDPSWest are asking anyone that took video or pictures of the active shooter event to submit their digital media to https://t.co/K5E4scfTGW.
— FBI El Paso (@FBIElPaso) August 4, 2019