वॉशिंग्टनः चीनच्या मागणीनुसार काश्मीरच्या मुद्द्यावर बोलावलेली संयुक्त राष्ट्रातल्या सुरक्षा परिषदेची बैठक संपली आहे. संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर मिसळले असून, भारताच्या बाजूनं नेहमीप्रमाणे रशिया उभा राहिला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी दूत अकबरुद्दीन म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं हा भारताचा अंतर्गत विषय आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर बाहेरच्या लोकांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जिहादच्या नावावर पाकिस्तान हिंसा पसरवतोय. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. पाकिस्तानला दहशतवादाला पोसणं थांबवावं लागेल, त्यानंतरच काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडवणं शक्य आहे.
Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर; भारताला रशियाचं समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:04 PM