कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर, जपान आता भारत आणि बांगलादेश या दोन देशांकडे आजारातून मुक्त होणारी प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहत आहे. जपानने चीनमधून भारतात येणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची ऑफर दिली आहे. यासंदर्भात चीनकडून पुरवठा अवलंबन कमी करण्याची जपानची इच्छा आहे.निक्कीच्या अहवालानुसार, अनुदान कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचे जपानचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून एखाद्या विशिष्ट प्रदेशावरील आपले अवलंबित्व कमी करता येईल आणि आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय पुरवठा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा शाश्वत पुरवठा करणारी यंत्रणा विकसित करता येईल.जपान सरकारने 2020च्या पूरक अर्थसंकल्पात आशियाई प्रदेशातील कंपन्यांना त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबरच प्रोत्साहित करण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात 23.5 अब्ज येनचे वाटप केले आहे.भारत आणि बांगलादेश यांना प्रकल्पांच्या पुनर्वसनस्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे, ज्यामुळे आसियान-जपान पुरवठा शृंखलेमध्ये लवचिकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत दुसर्या टप्प्यातील सप्टेंबरपासून कंपनी हलवण्याची अर्जप्रक्रिया सुरू होणार आहेत.जपान कित्येक अब्ज येनचे अनुदान देणारनिक्कीच्या अहवालानुसार, जपानकडून त्यांच्या उत्पादन कंपन्या चीनमधून भारतात हलविणार्यांना अनुदान म्हणून जपानकडून मिळणारी सबसिडी अनेक अब्ज येन इतकी आहे. सध्या जपानी कंपन्यांची पुरवठा साखळी मुख्यतः चीनवर अवलंबून असते. परंतु कोरोना साथीच्या काळात पुरवठा कमी केला.
आता जपाननेही दिला ड्रॅगनला मोठा धक्का, भारतात येणाऱ्या कंपन्यांना देणार सबसिडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 10:11 AM