टोकियो- नेहमीच्या वेळेच्या तीन मिनिट आधी जेवायला गेल्याने एका कर्मचाऱ्याचा पगार कापल्याची घटना जपानमध्ये घडली आहे. तीन मिनिटं लवकर जेवायला गेला म्हणून एका कंपनीने कर्मचाऱ्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कापला आहे. वेळ पाळली नाही म्हणून त्या कर्मचाऱ्या शिक्षा झाली.
जपानमधल्या वॉटरवर्क ब्यूरोमध्ये हा 64 वर्षीय व्यक्ती काम करत होता. गेल्या सात महिन्यात तो जवळपास 26 वेळा वेळेच्या आधी जेवायला गेला म्हणून त्याचा पगार कापण्यात आला आहे. या कंपनीत दुपारच्या जेवणाची वेळ ही १ वाजताची आहे. पण हा कर्मचारी वेळेआधी जेवायला जातो त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. इतकंच नाही तर यासाठी सर्वांसमोर त्याला माफीही मागावी लागली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच कंपनीने एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलं होतं. एकूण 55 तास कमी भरले तसेच कामाच्या वेळेत तो जेवण आणण्यासाठी ऑफिसमधून बाहेर जायचा या कारणामुळे त्याला काढून टाकण्यात आलं होतं.