वॉशिंग्टन - अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक भाषण करताना आज जो बायडेन यांनी अमेरिकेसमोरच्या समस्या आणि आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीची रूपरेषा देशासमोर आणि जगासमोर मांडली. यावेळी बायडन यांनी त्यांच्या सहकारी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचेही विशेष कौतुक केले.आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान, कमला हॅरिस यांचा उल्लेख करताना जो बायडन म्हणाले की, कमला हॅरिस ह्या अमेरिेकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. आज आपण एका महिलेला या जबाबदारीच्या पदासाठी शपथ घेताना पाहिले. त्यामुळे काही गोष्टी कधीच बदलू शकत नाही असा विचार कधी करू नका. भारतातील तामिळनाडूमध्ये आजोळ असलेल्या कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षातील अध्यक्षीय उमेदवारीसाठी बायडन यांना आव्हान दिले होते. मात्र नंतर आपली दावेदारी मागे घेत त्या बायडन यांच्या समर्थक बनल्या होत्या.