Kantara For Oscar : यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘कांतारा’ने अख्ख्या जगाचे लक्ष वेधले. रिषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) या कन्नड चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'कांतारा' ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला याचीच दखल आता घेण्यात आली आहे. आता हा चित्रपट ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत सामील झाला आहे.
अतिशय कमी बजेटमध्ये बनलेल्या 'कांतारा' या चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली. 'आरआरआर' (RRR) नंतर कांतारा देखील आता ऑस्करच्या स्पर्धेत सामील झाला आहे. २०२३ च्या ऑस्कर नॉमिनेशनसाठी चित्रपटाला पाठवण्यात आले आहे. Hombale Productions चे संस्थापक विजय किरगंदूरने बातमीला दुजोरा दिला आहे.
विजय यांनी सांगितले, कांतारा बाबत आम्ही ऑस्करकडे अर्ज केला आहे. अद्याप नॉमिनेशन फायनल झालेले नाही. जगभरातील लोकांना आकर्षित करण्याची कांतारा मध्ये क्षमता आहे. यासोबतच कांताराला एक फ्रॅंचायझी बनवण्याची आमची योजना आहे. कांताराचा आता सिक्वल असेल की प्रिक्वल हे आम्ही ठरवणार आहोत. कांतारा २ साठी ठराविक प्लॅन तयार आहे मात्र यासाठी काही वेळेचे बंधन नाही.
रिषभ शेट्टी कांतारा मध्ये फक्त मुख्य भुमिकेत नाही तर त्यानेच चित्रपटाचे कथानक लिहिले आहे आणि दिग्दर्शनही केले आहे. सुरुवातीला सिनेमा कन्नडमध्ये रिलीज करण्यात आला. सिनेमाची लोकप्रियता पाहता नंतर चित्रपट तेलगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये डब करुन रिलीज करण्यात आला. १६ कोटीच्या बजेट मध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
कांतारा आता नेटफ्लिक्सवरही उपलब्ध करण्यात आला आहे.