लंडन - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय लोकांवर हल्ला केला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आयएसआयच्या समर्थक असलेल्या काही लोकांनी शनिवारी (9 मार्च) भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या मूळचे भारतीय असलेल्या लोकांवर हल्ला केला. काश्मिरी आणि खलिस्तानी समर्थक संघटनांचे लोक भारताविरोधी घोषणाबाजी करत होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. परंतु, चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. ओवरसीज पाकिस्तानी वेलफेअर काउंसिल (ओपीडब्ल्यूसी) आणि शीख फॉर जस्टिस गट, आणि ब्रिटन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीमधील लोकांमध्ये वाद झाला.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. तब्बल 48 वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. 48 वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी 1971 साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.