उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचं शस्त्रांबद्दलचे प्रेम पाहून त्यांना लिटिल रॉकेट मॅनही बोलले जाते. लवकरच ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटणार आहेत. परंतु ते पुतिन यांना भेटण्यासाठी प्लेनने जाणार नसून ट्रेनने प्रवास करणार आहेत. किम जोंग याआधी चीनलाही ट्रेनने गेले होते. या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची मुलाखत रशियाला शस्त्रे पुरवठा करण्याबाबत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्याने ही भेट महत्त्वाची मानली जाते.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, ३९ वर्षीय किम यांना ही ट्रेन वडील किम जोंग इल यांच्याकडून वारसा हक्काने मिळाली आहे. किम यांना प्लेनमध्ये बसण्यास भीती वाटते. त्यामुळे किम जोंग हे ट्रेनने जात आहेत. आता हुकूमशाह ट्रेनने जातोय म्हटल्यावर त्यांचा शाहीथाटही सोबत असणार आहे. या ट्रेनचा वेग ३७ किमी प्रतितास असेल. त्यात काँन्फरन्स रुम, सॅटेलाईट फोन, फ्लॅटस्क्रीन टीव्ही आणि १०० हून अधिक सुरक्षा जवान असणार आहेत. या जवानांचे काम रस्ता आणि स्टेशन्सची सुरक्षा करणे हे आहे. बॉम्ब अथवा कुठल्याही अन्य हल्ल्यापासून वाचण्यासाठी ही ट्रेन पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे.
ट्रेनमध्ये शेफही आहे, जो रशिया, चीन कोरियन, जपानी आणि फ्रेंच जेवण बनवण्यास एक्स्पर्ट आहेत. या ट्रेनमधून जिवंत समुद्री जीवही घेऊन जातात जेणेकरून ताजे जेवण देता येईल. या ट्रेनमध्ये इंटरटेनमेंटसाठी महिला वाहकही आहेत. त्यांना सुंदर लेडी कंडक्टर म्हटलं जाते. हल्ल्याची शक्यता लक्षात घेता किम जोंग उन यांच्या ट्रेनच्या पुढेही एक ट्रेन जात असते. किम रविवारी रशियाच्या व्लादिवोस्तोक याठिकाणी पोहचण्याची शक्यता आहे. ती ट्रेन रशियाची पीयर ३३ जवळ जाईल. त्याशिवाय किम मॉस्कोही जाणार आहेत.