कुवेतची भारताला मोठी मदत! २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना, एकूण १४०० टन ऑक्सिजन भारतात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:35 PM2021-05-07T17:35:48+5:302021-05-07T17:36:29+5:30

भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आता कुवेत देश मदतीला धावून आला आहे. कुवेतनं २१५ टन द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन पाठवला आहे.

Kuwait sends 215 MT of oxygen to india ready to supply 1400 MT in all says envoy | कुवेतची भारताला मोठी मदत! २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना, एकूण १४०० टन ऑक्सिजन भारतात येणार

कुवेतची भारताला मोठी मदत! २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना, एकूण १४०० टन ऑक्सिजन भारतात येणार

Next

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. एका दिवसात तब्बल ४ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक कोरोना रुग्णांचे जीव जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आता कुवेत देश मदतीला धावून आला आहे. कुवेतनं २१५ टन द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन पाठवला आहे. आज चार जहाजं कुवेतहून भारतासाठी रवाना झाली आहेत. येत्या शनिवारपर्यंत भारतात हा ऑक्सिजन दाखल होण्याची शक्यता आहे. (Kuwait sends 215 MT of oxygen to india ready to supply 1400 MT in all says envoy)

विशेष म्हणजे, भारतासाठी येत्या तीन आठवड्यांमध्ये एकूण १,४०० टन ऑक्सिजन पाठवण्याची तयारी कुवेतनं दाखवली आहे. कुवेतच्या मदतीमुळे भारतातील ऑक्सिजन तुटवडा भरुन निघण्यास फार मोठी मदत होणार आहे. भारतीय नौदलानंही द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन, मेडिकल साहित्य आणि इतर महत्वाच्या वस्तू आणण्यासाठी आपली ९ लढाऊ जहाजं विविध देशांमध्ये पाठवली आहेत. त्यातील तीन जहाजं कुवेतला ऑक्सिजन आणण्यासाठी पाठवण्यात आली होती. 

"भारतीय नौदलातील तीन युद्धनौका आणि व्यावसायिक जहाजं कुवेतहून एकूण २१५ टन ऑक्सिजन घेऊन निघाली आहेत. मुंबई आणि गुजरातमधील बंदरांवर शनिवारपर्यंत ती पोहोचतील", अशी माहिती कुवेतचे राजदूत जसेम इब्राहिम अल नजीम यांनी सांगितले. 

"केवळ २१५ टन नव्हे, तर युद्धनौका पुन्हा कुवेतला रवाना होऊन येत्या काळात आणखी ऑक्सिजन आणण्याची नौदलाची तयारी आहे. तसेच कुवेतनंही १४०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे",असंही इब्राहिम अल नजीम यांनी सांगितलं. 

देशात सध्या दिवसाला ४ लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आरोग्य सुविधा, डॉक्टर्स आणि इतर आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानं मोठं संकट देशासमोर उभं राहिलं आहे. देशाकडून ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जात आहेत. यात ऑक्सिजनची आयात आणि देशात ऑक्सिजन प्लांटची उभारणी यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. 

Web Title: Kuwait sends 215 MT of oxygen to india ready to supply 1400 MT in all says envoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.