ब्रिटनने अब्जो डॉलर खर्च करुन बांधलेल्या नव्या को-या युद्धजहाजाला लागली गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:54 PM2017-12-19T16:54:50+5:302017-12-19T17:05:16+5:30

ब्रिटनची आजवरचे सर्वात मोठे युद्धजहाज एचएमएस क्वीन एलिझाबेथमध्ये बिघाड झाला असून या युद्धजहाजामधून गळती होत असल्याचे समोर आले आहे.

Leaks in Britain's biggest ever new HMS Queen Elizabeth | ब्रिटनने अब्जो डॉलर खर्च करुन बांधलेल्या नव्या को-या युद्धजहाजाला लागली गळती

ब्रिटनने अब्जो डॉलर खर्च करुन बांधलेल्या नव्या को-या युद्धजहाजाला लागली गळती

Next
ठळक मुद्दे65 हजार टन वजनाची क्वीन एलिझाबेथ ही ब्रिटनची सर्वात अत्याधुनिक युद्धनौका आहे.एचएमएस क्वीन एलिझाबेथची लांबी  280 मीटर (920) फुट आहे. 

लंडन - ब्रिटनचे आजवरचे सर्वात मोठे युद्धजहाज एचएमएस क्वीन एलिझाबेथमध्ये बिघाड झाला असून या युद्धजहाजामधून गळती होत असल्याचे समोर आले आहे. दोन आठवडयापूर्वीच राणीच्या उपस्थितीत समारंभपूर्वक एचएमएस क्वीन एलिझाबेथचा ब्रिटीश नौदलात समावेश करण्यात आला होता. या युद्धजहाजाच्या बांधणीसाठी तब्बल 4.2 अब्ज डॉलर्सचा खर्च आला आहे. या युद्धजहाजात तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. 

65 हजार टन वजनाचे क्वीन एलिझाबेथ हे ब्रिटनचे सर्वात अत्याधुनिक युद्धजहाज आहे. समुद्र चाचणी दरम्यान या युद्धजहाजामध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले होते असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. पार्टसमाऊथ बंदरात एलिझाबेथ युद्धजहाजाची दुरुस्ती करुन गळती थांबवण्यात येईल असे रॉयल नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. एचएमएस क्वीन एलिझाबेथची लांबी  280 मीटर (920) फुट आहे. 
या युद्धजहाजाच्या बांधणीला आठवर्ष लागली. हे युद्ध जहाज बांधणा-या कंपनीने जेव्हा नौदलाच्या ताब्यात ही युद्धनौका सोपवली त्यावेळी त्यात काही समस्या असल्याची नौदलाला कल्पना होती असे सन वर्तमानपत्राने म्हटले आहे. जेव्हा तुम्ही खरेदी केलेल्या नव्या को-या कारमध्ये काही बिघाड असतो तेव्हा तुम्ही ती गाडी गॅरेजमध्ये पाठवता इथे सुद्धा असेच आहे असे नौदल अधिका-याने सांगितले. 

क्वीन एलिझाबेथसाठी खास अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून एफ-35 विमाने विकत घेण्यात येणार आहेत. यासाठी सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेवर संसदेच्या संरक्षण समितीने मंगळवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्वीन एलिझाबेथवर एफ-35 विमानांचा ताफा सज्ज असेल. या संपूर्ण व्यवहारामध्ये पारदर्शकतेचा अभाव असून संरक्षण मंत्रालयाने प्रत्येक विमानाचा खर्च किती असेल त्याची माहिती दिलेली नाही असे संसदेच्या संरक्षण समितीने म्हटले आहे. 

Web Title: Leaks in Britain's biggest ever new HMS Queen Elizabeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.