जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सोमवारी (29 ऑक्टोबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली. लायन एअरवेजचं जकार्ताहून उड्डाण केलेलं विमान कोसळलं आहे. लायन एअरवेजचं जेटी 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळले आहे. उड्डाणाच्या 13 मिनिटांनंतर हे विमान कोसळले. जकार्ताहून पान्गकल पिनांगकडे हे विमान प्रवास करत होते. विमानानं उड्डाण केल्यानंतर सकाळी 6.33 वाजण्याच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. यानंतर थेट विमान कोसळल्याचीच माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर इंडोनेशिया प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान, विमानात क्रू मेम्बर्ससहीत 188 प्रवासी होते.