रियो डि जनेरियो: अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लियोनल मेसीची देश आणि खेळाबद्दलची आवड पहायला मिळाली. कोपा अमेरिका टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये कोलंबियाविरोधात अर्जेंटीनाने पेनल्टी शूटआउटद्वारे अंतिम सामन्यात धडक मारली. सामना सुरू असताना मेसीच्या पायाला दुखापत झाली. त्याच्या पायातून रक्त येत होते, पण तरीही तो खेळत राहिला आणि संघाला अंतिम सामन्यात नेले.
मेसीची फुटबॉलबद्दलची आवड पाहून दिग्गजांसह जगातील फुटबॉल चाहत्यांकडून त्याचे कौतुक होत आहे. एका युजरने सोशल मीडियावर लिहीले, दुसरा कुणी असता तर मैदान सोडून गेला असता. पण, मेसी नेहमीच आपल्या संघासाठी खेळतो. आज त्याने हे दाखवून दिले.
मेसीच्या पासवर मार्टिनेजने केला गोलसेमीफायनलचा पहिला गोल 7व्या मिनीटाला अर्जेंटीनाच्या लौतारो मार्टिनेजने केला. हा गोल त्याने मेसीच्या मदतीने केला. या एकमेव गोलसह अर्जेंटीनाने पहिला हाफ आपल्या नावे केला. दुसऱ्या हाफमध्ये कोलंबियासाठी लुइस डियाजने 61व्या मिनीटाला गोल करुन सामना बरोबरीत नेला. यावेळी 55व्या मिनीटाला कोलंबियाच्या फ्रेंक फेब्राने बॉल हिसकाऊन घेताना मेसीच्या पायावर किक मारली. यामुळे मेसीच्या पायातून रक्त येऊ लागले. पण, मेसीने दुखापत होऊनही हार मानली नाही आणि तो तसाच खेळत राहिला.
11 जुलै रोजी अंतिम सामनाकोपा अमेरिका 2021 चा अंतिम सामना 11 जुलैला रियो डि जनेरियोच्या माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना गतविजेत्या ब्राझील आणि अर्जेंटीनादरम्यान होईल. ब्राझीलकडे 7व्यांदार किताब जिंकण्याची संधी आहे. मेसीच्या अर्जेंटीनाने सर्वाधिक 9 वेळा विजयी होण्याचा मान मिळवला आहे. यंदाही अर्जेटींना प्रबळ दावेदार मानली जात आहे. तर, ब्राझीलने यापूर्वी 6 वेळा किताब जिंकला आहे.