लंडन - मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य माणूस आहे. माझ्याकडूनही चुका होऊ शकतात, पण चुकीच्या इराद्याने कुठलेही काम करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लंडन येथील टाऊनहॉल येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले. ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये भारत की बात सबके साथ कार्यक्रमात सहभाग घेतला. टाऊनहॉल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसून जोशी यांनी मोदींची मुलाखत घेतली यावेळी मोदींना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मोदींनी देशात सरकारकडून सुरू असलेले काम, विविध योजना, देशासमोर उभ्या असलेल्या समस्या यांची माहिती दिली.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे:-
- इतिहासाने माझं स्मरण ठेवावं, ही माझी अपेक्षा नाही- मोदी
- टीका हे लोकशाहीच्यादृष्टीने एकप्रकारचं सौदर्यं- मोदी
- काँग्रेसच्या तुलनेत आमच्या सरकारने देशाच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडली नाही- मोदी- 2014 पूर्वी 'आज इतना गया' वृत्तपत्रात असे मथळे पाहायला मिळायचे, परंतु आज 'मोदीजी कितना आया' असे मथळे पाहायला मिळतात- मोदी- मला कोणासाठी ओझं व्हायचं नाही, त्यामुळे शरीर आणि मन तंदरुस्त राखण्याचा प्रयत्न करतो- मोदी
- संत बसवेश्वरांचे महिला सबलीकरण, लोकशाही आणि सामाजिक कार्य जगासाठी आदर्श- नरेंद्र मोदी
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली संस्कृती व इतिहास पुसायचा प्रयत्न झाला, हे आपल्या देशाचे दुर्दैव- नरेंद्र मोदी
- मी तुमच्यासारखाच सामान्य माणूस, माझ्यातही तुमच्याप्रमाणे काही उणीवा असतील- नरेंद्र मोदी- आपल्यासमोर लाखो समस्या असतील पण त्या सोडवायला अब्जावधी लोकही आहेत, हे लक्षात ठेवा- नरेंद्र मोदी- भगवान बसवेश्वरांनी जातपात नष्ट करून समाजात समानता प्रस्थापित केली
- आम्ही स्वस्त आणि जेनरिक औषधे उपलब्ध केली आहेत
- मोदी केअरमधून गरीबांना चांगले उपचार मिळतील
- मुलांना शिक्षण, तरुणांना कमाई, आणि वृद्धांना औषधोपचार, चांगल्या कुटुंबासाठी तीन गोष्टी आवश्यक
- नोटाबंदीनंतर सर्वसामान्य नागरिक कष्ट झेलण्यासाठी तयार होते
- मिलीयन प्रॉब्लेम्स असतील तर बिलीयन सोल्युशनही आहेत
- माझ्याकडूनही चुका होऊ शकतात, पण चुकीच्या हेतूने कुठले काम करणार नाही - मोदी
- मी तुमच्यासारचाखा सर्वसामान्य माणूस
- 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम केले
- भारत की बात सबके साथ - मला गरिबी पुस्तकात वाचून शिकावी लागली नाही - सर्जिकल स्ट्राइकची माहिती प्रसारमाध्यमांपूर्वी पाकिस्तानला दिली - भारत की बात सबके साथ - जर कुणी पाठीत वार केला तर त्यांना जशास तसे उत्तर देणे जाणतो - सर्जिकल स्ट्राइकची परंपरा हजारो वर्षे जुनी - देशाला आपल समजून काम करण्याची गरज - 40 लाख ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे प्रवासातील सवलत स्वखुशीने सोडली - लोकशाहीत जनतेचा जितका अधिक सहभाग घेत- लोकशाही हे काही काँन्ट्रॅक्ट अॅग्रिमेंट नाही, तर भागीदारीचे काम - सरकार देश बदलेल, सरकार विकास करेल अशी मानसिकता बनली आहे - महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढाईला जनआंदोलनामध्ये परिवर्तित केले - नीती स्पष्ट असेल, इरादे साफ असतील तर तुम्ही लक्ष्य गाठू शकता - मोदी - सर्वजन हिताय सर्वजन सुखाय संकल्प घेऊन चालताना निराश होऊन चालत नाही - रस्तेबांधणी, रेल्वे ट्रॅक, घरबांधणी, टॉयलेट सगळ्यांचे काम तिप्पट वेगाने सुरू आहे. - आधीच्या तुलनेत सध्या देशात तिप्पट अधिक वेगाने काम होत आहे- भारत की बात - घाई वाईट गोष्ट आहे असे तुम्ही मानत असाल तर तुम्ही म्हातारे झाले आहात