न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन सैल, लॉकअपमधून बाहेर पडण्याच्या दिशेनं प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:59 AM2020-04-29T02:59:40+5:302020-04-29T03:00:01+5:30
लोकांनीही त्यांना साथ दिली आणि आता परिस्थिती अशी आहे की, न्यूझीलंड देश आता लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची तयारी करीत आहे.
न्यूझीलंडने कोरोनावर यशस्वी मात केली. तसं करणारा न्यूझिलंड हा जगातला पहिला देश ठरला, असं अनेक माध्यमांनी नुकतंच प्रसिद्ध केलं. तसं दूरचित्रवाहिन्यांनीही दाखविलं, पण प्रत्यक्षात तसं नाही. तसं न्यूझिलंडच्या पंतप्रधानांनीदेखील स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यांच्याकडील कम्युनिटी स्प्रेड अर्थात स्थानिकांना होणारा संसर्ग थांबला असून, अजूनही काही संसर्ग रुग्ण आढळत आहेत.
मात्र, त्यावेळी काय खबरदारी घ्यायची, नेमकं काय करायचं, याचं नियोजन आणि अंमलबजावणी आता त्यांना जमली आहे. पंतप्रधान जेसिका आर्डन सांगतात की, ‘आमच्याकडे शून्य रुग्णसंख्या अजूनही झालेली नाही, पण झिरो टॉलरन्स फॉर कोरोना केसेस’ हे धोरण आम्हाला साधलेलं आहे.’ लॉकडाऊनचे नियम देशभर कठोरपणे पाळले जातील, यासाठी अत्यंत कठोर आणि नियोजित पावलं उचलली. त्याचं धोरण यासंदर्भात कडक होतं. नियम मोडणाऱ्या मंत्र्यांनाही त्यांनी प्रसंगी शिक्षा केली आहे.
लोकांनीही त्यांना साथ दिली आणि आता परिस्थिती अशी आहे की, न्यूझीलंड देश आता लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची तयारी करीत आहे. लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीत आता थोडी सूट मिळू शकते. टप्प्याटप्प्यानं जनजीवन सुरळीत सुरू करता येईल का, याचं नियोजन आणि अंमलबजावणीही न्यूझिलंडने सुरूकेली आहे. चौथ्याऐवजी तिसºया प्रतलावरचं लॉकडाऊन आता तिथं असेल. म्हणजेच लोकांना बाहेर फिरायला जायला, जवळचा प्रवास करायला, आॅफिसला जायला मुभा आहे. हॉटेलमधून पदार्थ पॅक करून घरी घेऊन जायलाही परवानगी देण्यात आली आहे. आज जितका वेळ लोक बाहेर आता त्यापेक्षा थोडी जास्त सवलतही आता देण्यात आली आहे.
येत्या बुधवारपासून शाळाही उघडत आहेत. अर्थात, पंतप्रधानांनीही सांगितलं आहे की, ज्यांना घरून काम करणं, आॅनलाईन शिकणं शक्य आहे, त्यांनी ते घरूनच करा. अजून पूर्ण धोका टळलेला नाही. कारण कोरोना संसर्गावर अद्यापही औषध सापडलेलं नाही.
त्याचा परिणाम असा झाला की, आता लोक गाड्या घेऊन घराबाहेर पडलेत. ट्रॅफिकचा आवाज पुन्हा येऊ लागला आहे. समाजमाध्यमात काहींनी त्यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली की, अजून धोका पूर्णपणे टळलेला नसताना इतपत मोकळीक सरकारने देणं योग्य नाही. मात्र, पंतप्रधानांचं म्हणणं आहे की, आमच्या व्यवस्था सज्ज आहेत आणि लोक
जबाबदार आहेत, त्यामुळे कोरोना आटोक्यात राहील याची काळजी घेण्यात येईल. लॉकडाऊनच्या बाहेर पडण्याचे मार्गही हळूहळू दिसू लागलेत, ही चांगली गोेष्ट आहे.