लंडनमध्ये वर्षभरात ४५४ अॅसिड हल्ले; लोकांना भीती, सरकारपुढे मोठेच आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:02 AM2017-12-03T01:02:03+5:302017-12-03T01:02:26+5:30
येथील एका रस्त्यावर रात्रीच्या वेळी डिलिव्हरी बॉय मोटरबाइकसह उभा होते. तेव्हाच दोन हल्लेखोरांनी त्यांच्या चेह-यावर अॅसिड फेकले आणि त्यांची बाइक चोरून नेली.
लंडन : येथील एका रस्त्यावर रात्रीच्या वेळी डिलिव्हरी बॉय मोटरबाइकसह उभा होते. तेव्हाच दोन हल्लेखोरांनी त्यांच्या चेह-यावर अॅसिड फेकले आणि त्यांची बाइक चोरून नेली.
माझी बाइक घेऊन जायचेहोते तर हत्यार म्हणून अन्य पर्यायही होते. त्यांनी अॅसिडचा वापर का केला? लंडनमध्ये अशा हल्ल्यांची संख्या वाढत आहे, असे त्या डिलिव्हरी बॉयचे म्हणणे आहे.
पण लंडनमध्ये होणा-या शेकडो अॅसिड हल्ल्यातील हा एक हल्ला आहे. गेल्या वर्षात येथे ४५४ अॅसिड हल्ले झाले आहेत. असे प्रकारचे हल्ले २०१५ मध्ये २६१, तर त्यापूर्वीच्या वर्षात १६६ झाले होते.
नागरिक भयभीत
अॅसिड सर्व्हायवर्स ट्रस्टचे प्रमुख जेफ शाह म्हणाले की, अॅसिड खरेदी करण्याच्या नियमात त्रुटी आहेत. त्यामुळे हल्ले वाढत आहेत. गृह सचिव एम्बर रुड यांनी याबाबत नवे प्रस्ताव सादर केले होते. यानुसार, अॅसिड खरेदीसाठी ग्राहकांना कारण द्यावे लागणार आहे. पण अॅसिड हल्ले रोखणे हे मोठे आव्हान आहे.