इजिप्तच्या कैरोमध्ये मोठ्या संख्येने कार एकमेकांवर आदळल्याने मुख्य कॅन्सर हॉस्पिटलला आग लागली. यामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कैरोच्या तहरीर चौकात झालेल्या अपघातात 30 अन्य लोक जखमी झाले आहेत.
गृह मंत्रालायाने सांगितल्यानुसार राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या बाहेर एका वाहनाला तीन कार आदळल्या. यानंतर मोठा स्फोट झाला. अपघातानंतर स्फोट झाल्याने त्याच्या झळा हॉस्पिटलला बसल्या. स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरीही तेथील एका बँकेच्या प्रवेशद्वाराच्या काचा फुटल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जखमींना जवळच्या हॉस्पिटलांमध्ये भरती करण्यात आले आहे. मंत्री हाला जायद यांनी सांगितले की, जवळपास 54 लोकांना कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि जवळच्या इस्पितळांमध्ये भरती करण्यात आले आहे. या स्फोटामुळे हॉस्पिटलचा काही भागाचेही नुकसान झाले आहे. तसेच बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांनाही आग लागली आहे.