CoronaVirus News : मालदीव जुलैमध्ये पर्यटकांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 03:23 AM2020-06-25T03:23:59+5:302020-06-25T03:24:19+5:30
येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपले आजार वा प्रकृती याची आधी माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माले : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवमध्ये १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय पर्यटक येऊ शकतील. मालदीवचे पंतप्रधान इब्राहिम मोहमद सोली यांनी बुधवारी ही घोषणा करताना सांगितले की, १५ जुलैपासून या बेटावरील ज्या भागांत निर्बंध नाहीत, तेथील रिसॉर्ट, हॉटेल सर्र्वासाठी खुली असतील.
ज्या भागांत निर्बंध लागू असतील, तेथील हॉटेल व रिसॉर्ट १ आॅगस्ट रोजी सुरू होतील. मात्र सर्व पर्यटकांसाठी आम्ही नवी नियमावली तयार करीत आहोत. ज्या पर्यटकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत, त्यांना क्वारंटाइनमध्ये राहण्याची गरज भासणार नाही. ज्यांच्यामध्ये ती दिसतील, त्यांच्यासाठी १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचे राहील. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपले आजार वा प्रकृती याची आधी माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मालदीवमध्ये आतापर्यंत २२३८ रुग्ण आढळले आहेत.
असून, त्यापैकी १८१३ जण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि आठ जण मरण पावले आहेत. गेल्या २४ तासांत तिथे १४ नवे रुग्ण आढळले. (वृत्तसंस्था)े