मालीच्या पंतप्रधानांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:27 AM2019-04-20T04:27:19+5:302019-04-20T04:27:27+5:30
वाढता हिंसाचार रोखण्यात आणि गेल्या महिन्यात झालेल्या हत्याकांडावरून चौफेर टीकेची झोड उठल्याने मालीचे पंतप्रधान सौमेलोयू बोबेय मॅगा यांनी आपल्या सरकारसह राजीनामा दिला.
बमाको : वाढता हिंसाचार रोखण्यात आणि गेल्या महिन्यात झालेल्या हत्याकांडावरून चौफेर टीकेची झोड उठल्याने मालीचे पंतप्रधान सौमेलोयू बोबेय मॅगा यांनी आपल्या सरकारसह राजीनामा दिला. राष्टÑाध्यक्ष इब्राहिम बुबकर किटा यांनी मॅगा सरकारचा राजीनामा स्वीकृत केला आहे.
सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे खासदार बुधवारी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. मॅगा आणि त्यांचे सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप खासदारांनी केला. लवकरच नवीन पंतप्रधान नियुक्त करून नवीन सरकार स्थापन केले जाईल. (वृत्तसंस्था)नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स विधेयकाची तलवार बांगलादेशी स्थलांतरितांच्या डोक्यावर असल्यामुळे मुस्लिम मते ही तृणमूल काँग्रेस उमेदवाराला एकगठ्ठा मिळू शकतील. पर्यायाने अभिजित मुखर्जींच्या अडचणी वाढल्या आहेत.