Video: 'फोनवर बिझी होता, स्कूटरसह खड्ड्यात पडला'
By sagar.sirsat | Published: August 18, 2017 10:10 PM2017-08-18T22:10:25+5:302017-08-18T22:14:08+5:30
गाडी चालवताना फोनवर बोलू नये अशा सूचना अनेकदा केल्या जातात पण अनेकजण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणं किती महागात पडू शकतं याचा हा व्हिडीओ म्हणजे उत्तम उदाहरण
ग्वांगशी, दि. 18 - गाडी चालवताना फोनवर बोलू नये अशा सूचना अनेकदा केल्या जातात पण अनेकजण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. चीनमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणं किती महागात पडू शकतं याचा हा व्हिडीओ म्हणजे उत्तम उदाहरण आहे.
चीनमधील एक न्यूज वेबसाइट Shanghaiist च्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. 18 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पहिल्या भागात चीनमधील ग्वांगशी शहरातील रस्त्याचा एक मोठा भाग खचताना दिसतो. थोड्यावेळाने एक स्कूटर चालक त्या रस्त्याने जात असतो. पण त्याचं समोरच्या रस्त्याकडे लक्ष नसतं कारण तो फोनवर बोलत असतो, आणि त्यामुळे तो स्कुटरसह थेट रस्ता खचून झालेल्या खड्ड्यात जाऊन पडतो.
नशीब चांगलं म्हणून या दुर्घटनेत त्याला जास्त दुखापत झाली नाही. थोड्यावेळानंतर तो स्वतःच त्या 6 फूट खड्ड्यातून बाहेर येतो. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये रेकॉर्ड झाली आहे.
पाहा व्हिडीओ-