NASA Mars Rover : नासाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करण्यात बजावली मोलाची भूमिका; जाणून घ्या कोण आहेत डॉ. स्वाती मोहन?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 08:43 AM2021-02-19T08:43:15+5:302021-02-19T08:58:46+5:30

NASA Mars Rover And Dr Swati Mohan : मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आले आहे. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे.

Meet Indian American who leads NASA's operation Perseverance Rover Landing on Mars | NASA Mars Rover : नासाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करण्यात बजावली मोलाची भूमिका; जाणून घ्या कोण आहेत डॉ. स्वाती मोहन?

NASA Mars Rover : नासाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करण्यात बजावली मोलाची भूमिका; जाणून घ्या कोण आहेत डॉ. स्वाती मोहन?

Next

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने (NASA) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 7 महिन्यांपूर्वी मंगळावर पाठविलेले ‘पर्सिव्हरन्स’ (Perseverance) रोव्हरचे यशस्वीरित्या लँडिंग झालं आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजून 25 मिनिटांनी हे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळाच्या भूमीवर उतरलं आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर उतरताच नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रपल्सन लॅबोरेटरीमधील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसून आलं. मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आलं आहे. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे. हे रोव्हर 29.55 कोटी मैलचे अंतर कापून मंगळावर दाखल झालं आहे.  

एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागावर रोव्हर लँडिंग करणं हे अंतराळ विश्वातील अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. या ऐतिहासिक मोहिमेचा भाग बनलेल्या वैज्ञानिकांमध्ये भारतीय-अमेरिकन डॉ. स्वाती मोहन (Dr Swati Mohan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ. स्वाती मोहनसुद्धा या संपूर्ण विकास यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. नासाच्या डॉ. स्वाती यांनी "मंगळावरील टचडाऊनची माहिती मिळाली आहे. आता तिथे जीवसृष्टीचा वेध घेण्याचं काम सुरू करण्यास तयार" असल्याचं म्हटलं आहे. संपूर्ण जग हे ऐतिहासिक लँडिंग पाहत असताना कंट्रोल रुममधून स्वाती जीएन अँड सी सबसिस्टम आणि संपूर्ण प्रोजेक्ट टीम यांच्याशी समन्वय साधत होत्या. 

ऐतिहासिक मोहिमेदरम्यान मुख्य सिस्टम इंजिनिअर असतानाच त्या टीमची काळजी घेतात. तसेच GN & C साठी मिशन कंट्रोल स्टाफिंग शेड्यूल देखील करतात. स्वाती एक वर्षाच्या असताना भारतातून अमेरिकेत गेल्या. त्यामुळे त्यांचं बालपण हे तिथेच गेलं आहे. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम 'स्टार ट्रेक' पाहिली. त्यानंतर त्यांना याबाबत कुतूहल निर्माण झालं. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांना बालरोगतज्ञ व्हायचं होतं. स्वाती यांनी कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये विज्ञान विषयात पदवी संपादन केली आणि एरोनॉटिक्स / एस्ट्रोनॉटिक्समध्ये एमआयटीमधून एमएस आणि पीएचडी पूर्ण केली आहे. 

नासाची ऐतिहासिक कामगिरी! मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हरचे यशस्वी लँडिंग

डॉ. स्वाती मोहन या नासाच्या विविध महत्त्वाच्या अभियानाचा एक भाग आहेत. भारतीय-अमेरिकन वैज्ञानिकांनी कॅसिनी (शनी मिशन) आणि ग्रील (चंद्राकडे उड्डाण करणारे अवकाशयानांची जोड) प्रकल्पांवरही काम केलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. नासाने आपल्या ट्विटर हँडलवर मंगळावर पोहोचलेल्या रोव्हरचा फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोला सुंदर कॅप्शनही दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, "Hello, world. My first look at my forever home." याशिवाय, नासाने रोव्हरच्या दुसऱ्या बाजूचा फोटोही शेअर केला आहे. पर्सिव्हरन्स रोव्हरमध्ये 23 कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

कॅमेऱ्यातून आवाज आणि व्हिडिओ रेकोर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मायक्रोफोन्सही लावण्यात आले आहेत.  पर्सिव्हरन्स रोव्हरसह दुसऱ्या ग्रहावर जाणारे पहिले हेलिकॉप्टर Ingenuity देखील आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर दोन वर्षापर्यंत Jezero Crater ला एक्सप्लोर करेल. पर्सिव्हरन्स हा कमांड सेट आहे. मात्र, पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची टीम त्याला मंगळावर चालण्यास, डोंगराळ भागावर लेझर लाइट मारण्यास, नमुने जमा करण्याआधी मार्गदर्शन करेल. जेजेरो क्रेटर मंगळावरील प्राचीन तलावाचा तळ समजला जातो. मंगळावर कधीतरी जीवसृष्टी असणार. त्याचे संकेत येथील जीवाश्मातून मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Meet Indian American who leads NASA's operation Perseverance Rover Landing on Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.