मेक्सिकोतील नाईटक्लबमध्ये गोळीबार; 15 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 10:31 AM2019-03-10T10:31:47+5:302019-03-10T10:48:31+5:30
मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पब्लिक प्रोसिक्यूटर्स कार्यालयाचे प्रवक्ते जुआन जोस मार्टिनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यात असलेल्या नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. एका अज्ञात हल्लेखोराने अचानक अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे नाईटक्लबमध्ये एकच गोंधळ उडाला होता. गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
#BREAKING: Mexico night club attack leaves 15 dead: prosecutor pic.twitter.com/wdI7r1eO9R
— AFP news agency (@AFP) March 9, 2019
कॅनडामधील टोरांटो शहरातील ग्रीक टाऊनमध्ये याआधी रविवारी (22 जुलै) एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला असून अन्य 13 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टोरांटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा हल्लेखोरदेखील ठार झाला. ग्रीक टाऊनमधील एका हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याची माहिती देणारा फोन आला होता. हॉटेलमधूनच रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास हा फोन आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.