मुंबई : गेल्या आठवड्यात मिस वर्ल्डचा किताब मिळवून मानुषी छिल्लरने आपल्या भारतीयांची मान पुन्हा एकदा ताठ केली. तब्बल १७ वर्षांनी भारतात हा जल्लोष साजरा करण्याचं भाग्य भारतीयांच्या पदरी पडलं. मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत पोहोचेपर्यंत अनेक कठीण मार्ग पार पाडावे लागतात. पण मिस वर्ल्डचा किताब अशाच सुंदरीच्या डोक्यावर चढवला जातो जी त्या शेवटच्या प्रश्नाचं सगळ्यात आकर्षक आणि समर्पक उत्तर देते. त्यामुळे त्या शेवटच्या क्षणी विचारलेल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर सुचणं आणि ते आत्मविश्वासाने संपूर्ण जगासमोर सांगणं हे काही सोपं काम नाही. हा सोहळा काही मर्यादित लोकांच्या उपस्थितीत नसतो. अख्खं जग आपल्याला या वेळी पाहत असतं. अख्ख्या जगासमोर समयसुचकता दाखवून प्रश्नाचं योग्य उत्तर देणाऱ्या सुंदरीलाच्या डोक्यावरच विश्वसुंदरीचा मुकुट चढतो. आज आपण पाहुया की, आजवर भारतातल्या विश्वसुंदरीनी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत हा मुकुट आपल्याकडे खेचून घेतला.
मानुषी छिल्लर, २०१७
प्रश्न- कोणत्या प्रोफेशनमध्ये जास्त पगार दिला गेला पाहिजे?
उत्तर - माझ्यामते आईला सर्वाधिक मान मिळायला हवा. आईची किंमत पैशांमध्ये करण्यापेक्षा तिला खूप सन्मान आणि प्रेम द्यायला हवं. माझ्या आयुष्यात माझ्या आईचा मोलाचा वाटा आहे. माझी आईच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे मला वाटतं की आईपेक्षा श्रेष्ठ असं प्रोफेशनच या जगात नाही. जगातील प्रत्येकाने आपल्या आईलाच मान-सन्मान द्यावा.
प्रियंका चोप्रा, २०००
प्रश्न- मिस वर्ल्ड मिळणं हे तुझ्यासाठी स्टेपिंग स्टोन वाटतं का?
उत्तर- मला जे काही करायचं आहे त्यासाठी मिस वर्ल्डचा किताब मिळणं हे नक्कीच स्टेपिंग स्टोन (महत्त्वाचा किताब किंवा महत्वाची पायरी) असेल. मला माझ्या विचाराने लोकांची मने वळवायची आहेत. मिस वर्ल्ड हे असं व्यासपीठ आहे जिथून मला संपूर्ण जगाशी संवाद साधायची संधी मिळेल. त्यामुळे माझ्या पुढच्या सगळ्याच कार्यासाठी मिस वर्ल्डचा किताब नक्कीच मोलाचा ठरणार आहे.
आणखी वाचा - मानुषी छिल्लरसारखी फिगर हवीये? -हे वाचा
युक्ता मुखी, १९९९
प्रश्न - एक मुलगी म्हणून तू आपल्या आईवडिलांना काय सल्ला देशील?
उत्तर - मी माझ्या आईवडिलांना एवढंच सांगू इच्छिते की आपण आपल्यातलं नातं इतकं दृढ करूया की आपल्याकडे पाहून लोकांनी सुखी कुटुंबाचं उदाहरण द्यायला हवं. तुम्ही मला जे काही शिकवलं आहे, त्या सगळ्या गोष्टी मी कायम लक्षात ठेवेन.
आणखी वाचा - मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली हे नोटाबंदीचे यश, उद्धव ठाकरेंचा टोला
डायना हेडन, १९९७
प्रश्न- जर जगात तू कोणीही असू शकतेस, तर तुला कोण असावं असं वाटेल?
उत्तर- मला ऑर्डे हेपबर्न (ब्रिटिश अभिनेत्री) व्हायला आवडेल. ती केवळ चेहऱ्याने सुंदर नाहीए तर तिच्या आतील सौंदर्यही प्रत्येकाला आकर्षित करत असते. तिच्यातील करुणा, शांत भाव हे सगळे गुणविशेष आकर्षित करणारे आहेत. त्यामुळे मला ऑर्डे हेपबर्न व्हायला आवडेल.
आणखी वाचा - 'चिल्लर'मधला 'चिल' विसरू नका, शशी थरूर यांच्या ट्विटला मानुषी छिल्लरचे प्रत्युत्तर
ऐश्वर्या राय, १९९४
प्रश्न- १९९४ च्या मिस वर्ल्डमध्ये काय वैशिष्ट्यं पाहिजेत?
उत्तर- मिस वर्ल्डमध्ये करुणा पाहिजे. ही करुणा एका विशिष्ट वर्गासाठी नसावी. जगातील प्रत्येक महिलेला तिच्या करुणेतून उर्मी मिळाली पाहिजे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या मिस वर्ल्डमध्ये हा दयाभाव होता, त्यामुळे १९९४च्या मिस वर्ल्डकडेही हे स्वभाववैशिष्ट्यं हवं असं मला वाटतं.
आणखी वाचा - ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब जिंकणा-या मानुषी छिल्लरबद्दल काही खास गोष्टी...!
रेइता फारिया, १९६६
प्रश्न- तुला डॉक्टर का व्हावसं वाटतंय?
उत्तर- सध्या सगळीकडेच स्त्रियांच्या आरोग्यकडे दुर्लक्ष दिलं जातं. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याकरता स्त्रीरोग तज्ज्ञांची गरज आहे. भारतातही स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसुतीतज्ज्ञांचीही गरज आहे. त्यामुळे मला डॉक्टर होऊन स्त्रियांच्या आरोग्यविषयी जनजागृती करायची आहे.